मुलाने चोरी केल्याचा तणाव; वडिलाने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 03:54 PM2019-02-14T15:54:15+5:302019-02-14T15:57:03+5:30

अल्पवयीन मुलाने सोन्याची बिस्किटे व दहा हजाराची रोकड चोरी करून पोबारा केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. ही बाब म्हस्के यांना सहन झाली नसावी व त्यामुळे आलेल्या तणावाने त्यांनी असे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला

Tension of the child being stolen; Life ended by father | मुलाने चोरी केल्याचा तणाव; वडिलाने संपविली जीवनयात्रा

मुलाने चोरी केल्याचा तणाव; वडिलाने संपविली जीवनयात्रा

Next
ठळक मुद्देसंशयित अल्पवयीन मुलगा सध्या परभणी पोलिसांच्या ताब्यातम्हस्के यांच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात

नाशिक : कॉँग्रेस प्रदेश प्रवक्ता व नगरसेविका हेमलता पाटील यांच्या बंगल्यात नोकर म्हणून मागील सहा ते सात वर्षांपासून कार्यरत असलेले श्रीपत उर्फ बंडू तुकाराम म्हस्के (५२, रा.कामटवाडे वावरेनगर) यांनी विषारी औषध सेवन करून भगुर बसस्थानकावर आत्महत्त्या केल्याची घटना घडली.
टिळकवाडी येथील पाटील यांच्या बंगल्यावर म्हस्के नोकरदार म्हणून मोलमजूरी करत होते. महिनाभरापुर्वी त्यांच्या धाकट्या अल्पवयीन मुलाने सोन्याची बिस्किटे व दहा हजाराची रोकड चोरी करून पोबारा केल्याचे मंगळवारी उघडकीस आले. ही बाब म्हस्के यांना सहन झाली नसावी व त्यामुळे आलेल्या तणावाने त्यांनी असे पाऊल उचलले असावे, असा अंदाज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केला आहे. म्हस्के यांच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात झाला असून कुटुंबाचा आधार हरपला. त्यांच्या मृतदेहावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. चोरीच्या गुन्ह्यात संशयित अल्पवयीन मुलगा सध्या परभणी पोलिसांच्या ताब्यात आहे.
म्हस्के हे मंगळवारी भगूर बस स्थानक परिसरात अचानकपणे निघून गेले. त्यांनी तेथे विषारी औषध सेवन केल्याने कोसळल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. तत्काळ नागरिकांनी भगूर पोलीस चौकीमधील कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी धाव घेत त्यांच्या मोबाईलवरून नातेवाईकांशी संपर्क साधला व त्यांना देवळालीच्या छावनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले; मात्र त्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. त्यांचे जावई अनिल गंगाधर हतांगळे यांनी त्यांची ओळख पटविली. मयत म्हस्के यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, जावई, भाऊ असा परिवार आहे.

 

Web Title: Tension of the child being stolen; Life ended by father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.