विवाहितेच्या मृत्यूमुळे तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:36 AM2017-09-04T00:36:02+5:302017-09-04T00:36:29+5:30

लग्नास अवघे अकरा महिने पूर्ण होत नाही तोच नवविवाहितेचा शेततळ्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२) दुपारच्या सुमारास पिंपळगाव बसवंत जवळील चिंचखेड येथे घडली़ प्रियंका महेश फुगट (२०, रा़ चिंचखेड) असे मयत विवाहितेचे नाव असून, मुलीच्या मृत्यूस जबाबदार नवरा व सासºयावर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका माहेरच्यांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता़

Tension due to the death of a marriage | विवाहितेच्या मृत्यूमुळे तणाव

विवाहितेच्या मृत्यूमुळे तणाव

Next

नाशिक : लग्नास अवघे अकरा महिने पूर्ण होत नाही तोच नवविवाहितेचा शेततळ्यात बुडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़२) दुपारच्या सुमारास पिंपळगाव बसवंत जवळील चिंचखेड येथे घडली़ प्रियंका महेश फुगट (२०, रा़ चिंचखेड) असे मयत विवाहितेचे नाव असून, मुलीच्या मृत्यूस जबाबदार नवरा व सासºयावर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका माहेरच्यांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता़ अखेर पोलीस बंदोबस्त व दंगल नियंत्रण पथकाने तणावावर नियंत्रण मिळविल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले़ दरम्यान, या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत सासरच्यांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
निफाड तालुक्यातील करंजगाव येथील प्रियंका मधुकर राजोळे (२०) हिचा अकरा महिन्यांपूर्वी पिंपळगाव बसवंतजवळील चिंचखेड येथील महेश बाबाजी फुगटसोबत विवाह झाला होता़ शनिवारी (दि़२) प्रियंका फुगट ही चिंचखेड शिवारात पालखेड पाटालगतच्या शेततळ्यात पडली़ नागरिकांनी तिला बाहेर काढल्यानंतर प्रथम पिंपळगाव व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ विशेष म्हणजे या घटनेची माहिती मुलीच्या माहेरच्यांना रात्री उशिरा देण्यात आली़
रविवारी (दि़३) मयत प्रियंकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी चिंचखेड येथे पोहोचलेल्या माहेरच्यांनी मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेला नवरा महेश फुगट व सासरा बाबाजी फुगट तसेच नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करीत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करू न देण्याची भूमिका घेतली़ यामुळे चिंचखेडमध्ये तणाव निर्माण झाला होता़ या परिस्थितीची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी देवीदास पाटील, वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए़ एस़ तारगे हे दंगल नियंत्रण पथक व पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी उपस्थित होते़ पोलीस अधिकारी पाटील यांनी मुलीच्या कुटुंबीयांची समजूत घातल्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले़

Web Title: Tension due to the death of a marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.