भाजप पदाधिकाऱ्याच्या भरदिवसा हत्येमुळे तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 01:54 AM2021-11-27T01:54:38+5:302021-11-27T01:55:35+5:30
युनियनच्या वर्चस्ववादातून भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष आणि महाराष्ट्रवादी कामगार संघ युनियनचे उपाध्यक्ष अमोल चंद्रकांत ईघे (३७) यांच्यावर कोयत्याने हल्ला करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) सकाळी सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. भरदिवसा राजकीय पदाधिकाऱ्यांची अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने सातपूर परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. नाशिक शहरात चार दिवसांत हा तिसरा खूनाच प्रकार असून त्यातच भाजप पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने पक्षाच्या तिन्ही आमदारांसह भाजपा कार्यकर्त्यांनी साडेचार तास सातपूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, संशयीत आरोपीला पोलिसांनी ठाणेे जिल्ह्यात अटक केली आहे.
सातपूर (नाशिक) : युनियनच्या वर्चस्ववादातून भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष आणि महाराष्ट्रवादी कामगार संघ युनियनचे उपाध्यक्ष अमोल चंद्रकांत ईघे (३७) यांच्यावर कोयत्याने हल्ला करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) सकाळी सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली. भरदिवसा राजकीय पदाधिकाऱ्यांची अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याने सातपूर परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते. नाशिक शहरात चार दिवसांत हा तिसरा खूनाच प्रकार असून त्यातच भाजप पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने पक्षाच्या तिन्ही आमदारांसह भाजपा कार्यकर्त्यांनी साडेचार तास सातपूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, संशयीत आरोपीला पोलिसांनी ठाणेे जिल्ह्यात अटक केली आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील इंडियन रायटिंग कंपनीत महाराष्ट्रवादी कामगार संघ युनियन असून या युनियनचे उपाध्यक्ष म्हणून भाजप मंडल अध्यक्ष अमोल ईघे हे काम पहात होते. याच कंपनीत राष्ट्रवादी प्रणित वंचित कामगार संघ ही नवीन कामगार संघटना सुरू करण्यावरून ईघे यांचेच एकेकाळचे सहकारी असलेले विनोद बर्वे यांच्यात वाद निर्माण झाला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यावरून देाघांमध्ये खटके उडत होते. दरम्यान, अमोल ईघे हे नेहमी प्रमाणे शुक्रवारी (दि.२६) सकाळी कंपनीत गेले असता संशयित विनोद बर्वे या कामगाराने इघे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यानंतर त्यास औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. अमोल ईघे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
इन्फो...
राष्ट्रवादीशी संबंधीत आरोपी आणि भाजपचा आरोप
हत्या केल्याचा आरोप असलेल्या विनोद बर्वे याने अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर युनियन स्थापन केली होती. त्यामुळे भाजपचे मंडल पदाधिकारी असलेल्या इघे यांच्या हत्येनंतर त्याला काहीसे राजकीय स्वरूप प्राप्त झाले. भाजप नेत्यांनी आंदोलन करताना पालकमंत्री छगन भुजबळ यांना लक्ष केले तसेच पालकमंत्री आणि पोलीस आयुक्त हटावच्या घोषणा दिल्या.
इन्फो-
युनियनमध्ये डावलल्याची द्वेषभावना
संशयित आरोपी विनोद बर्वे हा देखील याच कंपनीत कामाला होता. परंतु वर्षभरापूर्वी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने व्यवस्थापनाने त्याला निलंबित केले होते. तो पूर्वी युनियनचा पदाधिकारीही होता. परंतु, काही दिवसांपासून युनियनमध्ये डावलले जात असल्याची द्वेषभावना निर्माण झाल्याने मयत अमोल आणि बर्वे यांच्यात वाद निर्माण होऊ लागले होते.