दहावी, बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सुटसुटीत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:15 AM2021-03-21T04:15:04+5:302021-03-21T04:15:04+5:30

दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांचे विद्यार्थी व पालकांसह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक , मुख्याध्यापकांनीही ...

Tenth and twelfth standard examinations will be convenient for the students | दहावी, बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सुटसुटीत होणार

दहावी, बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सुटसुटीत होणार

Next

दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांचे विद्यार्थी व पालकांसह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक , मुख्याध्यापकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र दहावी व बारावीच्या परीक्षांसदर्भात शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेताना कोरोनामुळे ही परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देण्याची संधी देतानाच पुढील प्रवेशासाठीही समान संधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालक व शिक्षकांकडून होत आहे. दरम्यान, दहावी बारावीच्या परीक्षांसदर्भात निर्णय घेताना विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा मुख्य लेखी परीक्षेनंतर देण्याची सवलत मिळाली असून या परीक्षा लेखी गृहपाठ पद्धतीने देणे शक्य असल्याने विद्यार्थ्यांमध्येही या निर्णयाचे स्वागत होत आहे.

कोट-१

शालेय शिक्षण विभागाने शाळास्तरावर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सुटसुटीत होणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आपल्या क्रमांकाची शोधाशोध आणि वाहतुकीतून परीक्षा केंद्रावर पोहचण्याचा ताण कमी होणार आहे.

- गुलाब भामरे, मुख्याध्यापाक

कोट- २

प्रत्येक शाळेला केंद्र देणे तसेच विदयार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, परीक्षेचे नियोजन करण्याची जबाबदारी संबधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षण संस्थाचालक, शाळा प्रशासन स्थानिक अथवा जिल्हा असून त्यादृष्टीने संबधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेणे आ‌वश्यक आहे. शिक्षक महासंघाने प्रात्यक्षिक परीक्षा दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेनंतर घेण्याची शासनाने मागणी मान्य केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला वेळ मिळेल.

-संजय शिंदे, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

कोट-३

शासनाने विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळणार आहे. अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला नसल्याने वाढीव वेळेत विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकतील.

सुभाष शिंदे, पालक

कोट-४

दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच परीक्षा केंद्र मिळणार असल्याने परीक्षेपूर्वी प्रवास करावा लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना शाळेसारखेच वातावरण असणार असल्याो त्यांच्यावर परीक्षेता ताण निर्माण होणार नाही. शिवाय प्रवासात कोरोना बाधा होण्याचा भितीही उरणार नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रीत करू शकतील.

शीतल जाधव, पालक

Web Title: Tenth and twelfth standard examinations will be convenient for the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.