दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 11:36 PM2020-01-05T23:36:21+5:302020-01-05T23:36:50+5:30
मालेगाव : येथील कॅम्पातील केबीएच विद्यालयात दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे यासाठी कलचाचणी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी ...
मालेगाव : येथील कॅम्पातील केबीएच विद्यालयात दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्रात आहे यासाठी कलचाचणी घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्र्राचार्य अनिल पवार होते.
यावेळी उपप्राचार्य एस.एच. बागुल, पर्यवेक्षक विलास पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक के. वाय देवरे यांनी मार्गदर्शन केले. ए. के. खेडकर यांनी स्कूल इंडेक्स नंबर, पासवर्ड यासंदर्भात माहिती दिली. उपप्राचार्य एस. एच. बागुल यांनी मार्गदर्शन केले. या चाचणीद्वारे विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षेची माहिती मिळते. परीक्षेचा सराव होता. दहावीनंतर काय करावे, कोणत्या शाखेत प्रवेश घेऊन आपले करिअर घडवायचे त्यासाठी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अनेकदा आवडीच्या क्षेत्रात प्रवेश न घेतल्याने अनेक अडचणी उद्भवतात म्हणून शासनाचा कल व अभिक्षमता चाचणी घेण्याचा उपक्र म स्तुत्य असून याÞचा फायदा घेऊन योग्य शाखेत प्रवेश घेऊन आपले करिअर घडवण्याचे आवाहन शिक्षकांनी केले.
सूत्रसंचालन राजेश धनवट यांनी केले. आभार राजेंद्र शेवाळे यांनी मानले. यावेळी वर्गशिक्षक ए. यू. वाघ, आर. डी. शेवाळे, एम.आर.अहिरे, ए.के. खेडकर, एस. एस. पाटील, आर. एम. धनवट, के. वाय. देवरे, एच. एन.सोनवणे, नितीन गवळी, व्यंकट मगर आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.