दहावी पुरवणी परीक्षा २० नोव्हेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 10:11 PM2020-11-11T22:11:42+5:302020-11-12T00:48:27+5:30
दिंडोरी : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी पुरवणी परीक्षा जुलैमध्ये होत असते; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा नोव्हेंबर/ डिसेंबरमध्ये होत असून, येत्या २० नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू होणार आहे. दिंडोरी केंद्र क्रमांक १७३० या केंद्राची आसनव्यवस्था जाहीर करण्यात आल्याची माहिती केंद्रसंचालक प्राचार्य बी. जी पाटील. यांनी दिली.

कोरोनाच्या या कालावधीत विविध नियम पाळून ै परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मंडळाने विविध मार्गदर्शक सूचना केंद्रसंचालक यांना दिल्या आहेत. दिंडोरी येथील केंद्र क्रमांक १७३० या केंद्रात होणाऱ्या परीक्षेची आसनव्यवस्था जनता इंग्लिश स्कूलच्या मुख्य इमारतीमध्ये करण्यात आली आहे.
परीक्षार्थींनी सर्व नियमांचे पालन करून वेळेत परीक्षेसाठी उपस्थित रहावे. परीक्षा यशस्वी करण्यासाठी केंद्रसंचालक बी. जी. पाटील, उपकेंद्रसंचालक संतोष कथार, अरुण पाटील आदींसह शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
बोर्डाच्या आदेशानुसार या वर्षीपासून उशिरा येणाऱ्या परीक्षार्थींना प्रवेश मिळणार नाही. परीक्षार्थीनी पेपरच्या दिवशी सकाळी १० वाजता केंद्रावर उपस्थित रहावे. १०.३० वाजता पेपर सुरू होईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळणार नाही. मास्क लावूनच परीक्षेसाठी यावे. केंद्रावर आल्यावर गेटजवळ साबण व पाणी ठेवले असेल त्याठिकाणी हात स्वच्छ घुवावे व सॅनिटायझर लावून पुढे थर्मल स्कीनिंग गनने ताप मोजला जाईल व त्यानंतर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल.