दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाच्या परीक्षेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:45+5:302021-03-15T04:14:45+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरू केली आहे.
नाशिकमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अकरावीसह पहिली ते नववीचे वर्ग बंद करण्यात आले असले तरी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांतील प्रश्नासंदर्भात शिक्षकांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभत असून शिक्षकही विद्यार्थ्यांकडून परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेत आहे. कोरोनामुळे यावर्षी पूर्णवेळ शाळा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे परीक्षेच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. मात्र ऐनवेळी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू नये,यासाठी शिक्षक व खासगी कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांकडून अधिकाधिक प्रश्नपत्रिकांचे संच सोडवून घेत आहेत. त्यातून विद्यार्थ्यांची पर्यायी प्रश्न निवडून निर्धारीत वेळेत पेपर पूर्ण करण्याची तयारी होत असल्याचे विद्यार्थी सांगतात.
इन्फो
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ते शिकत असलेल्या शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच होण्याची शक्यता व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून सध्याचे उपलब्ध परीक्षा केंद्र वाढविण्यात येणाच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
कोट
परीक्षेला अतिशय कमी वेळ उरला आहे. त्यामुळे शाळेत उर्वरीत अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर आणि पूर्ण झालेला अभ्यासक्रमाची उजळणी करण्यावर भर दिला जात आहे. शिक्षक पेपर वेळेत पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. त्यामुळे परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास वाढतो आहे.
- आकाश काळे, विद्यार्थी
कोट-
शाळेत गणित विज्ञान आणि इंग्रजी विषयांची उजळणी सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे इतिहास भूगोल मराठीसारख्या विषयासंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक ऑनलाईन वर्ग तसेच फोनवरूनही मदत करतात. क्लासमधील शिक्षकांनी सरावासाठी विशेष प्रश्नपत्रिका तयार करून दिल्या अशून त्या वेळत सोडविण्याचा सराव करण्याचा सल्ला दिला आहे.
-वैभव जाधव, विद्यार्थी
दहावीतील विद्यार्थी - ९८. ९४९
बारावीतीव विद्यार्थी -६७,९१८