टेरेस हॉटेल सील, मनपाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:18 AM2019-05-04T00:18:46+5:302019-05-04T00:19:53+5:30
टेरेसवरील (छत) जागेचा बेकायदेशीररीत्या हॉटेल्ससाठीच वापर करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, शरणपूररोडवरील दोन टेरेस हॉटेल्स सील केले आहेत, तर एका हॉटेलचे टेबल आणि खुर्च्या आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे
नाशिक : टेरेसवरील (छत) जागेचा बेकायदेशीररीत्या हॉटेल्ससाठीच वापर करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून, शरणपूररोडवरील दोन टेरेस हॉटेल्स सील केले आहेत, तर एका हॉटेलचे टेबल आणि खुर्च्या आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.३) अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
शहरातील अनेक हॉटेल्सच्या टेरेसचा बेकायदेशीर वापर सुरू आहे. महापालिकेने त्याकडे वक्रदृष्टी केली आहे. त्यातील काही हॉटेल्स तर नगररचना विभागाने नोटिसा बजावल्या तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. गुरुवारी (दि.२) महापालिकेच्या जवळच असलेल्या पतंग हॉटेल तसेच कुलकर्णी बागेजवळील टष्ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी हॉटेल आणि पंडित कॉलनीतील कोबा कबाना हॉटेलची तपासणी करून अतिक्रमण विरोधी पथकाने त्यांना वापर बंद करण्याची आगावू सूचना केली होती. परंतु त्यानंतरही संबंधितांनी टेरेसचा वापर सुरूच ठेवल्याचे शुक्रवारी (दि. ३) तपासणीत आढळले.
टेबल-खुर्च्या जप्त; कारवाई सुरूच राहणार
पंतग आणि टष्ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी या हॉटेल्सच्या टेरेसचे हॉटेल बंद करण्यात आले अन्य कामकाज मात्र नियमितपणे सुरू आहे, तर कोपा कबाना हॉटेल्सच्या टेबल आणि खुर्च्या जप्त करण्यात आल्या आहे.
महापालिकेच्या वतीने अशाप्रकारची कारवाई यापुढे सुरूच राहणार असून, संबंधितांनी बेकायदेशीररीत्या टेरेसचा वापर बंद करावा, अशी मागणी होत आहे.