उमराणे येथे तिव्र पाणीटंचाई ;प्रशासनाकडुन तुटपुंजा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 05:56 PM2019-05-27T17:56:18+5:302019-05-27T18:57:01+5:30

उमराणे : येथे व परिसरातील वाड्यावस्यांवर पाणीटंचाईने उग्र रु प धारण केले असुन येथील एकलव्य आदिवासी वस्तीत तर एका जलकुंभावर तब्बल दोनशे ते तिनशे हंडे पाणी भरण्यासाठी रांगेत असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे.

 Terrain water shortage at Umraane | उमराणे येथे तिव्र पाणीटंचाई ;प्रशासनाकडुन तुटपुंजा पाणीपुरवठा

उमराणे येथे तिव्र पाणीटंचाई ;प्रशासनाकडुन तुटपुंजा पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देउमराणे : पाणीटॅकर वाढविण्याची मागणी ; महिलांची कसरत

उमराणे : येथे व परिसरातील वाड्यावस्यांवर पाणीटंचाईने उग्र रु प धारण केले असुन येथील एकलव्य आदिवासी वस्तीत तर एका जलकुंभावर तब्बल दोनशे ते तिनशे हंडे पाणी भरण्यासाठी रांगेत असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे.
उमराणे गाव व परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी पाणीपुरवठा करणार्या परसुल धरणातील पाणी गेल्या एक मिहन्यापासून आटल्याने गावासह परिसरातील वाड्या वस्त्यांवर होणारा पाणीपुरवठा पुर्णत: विस्कळीत झाला आहे. सद्यस्थितीत गावासाठी परसुल धरणातील मृत साठ्यातील साठवणुक केलेले तसेच प्रशासनाकडुन रामेश्वर धरणातुन व महालपाटणे येथील अधिग्रहित केलेल्या विहिरीतुन तिन ट्करद्वारे तब्बल दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होत असतानाच मात्र वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला जिकरीचे बनले आहे. त्यामुळे यावास्तव चित्र निर्माण झाले आहे.शिवाय वाड्यावस्त्यांवरील कुपनलीका बंद पडल्या असुन पेयजल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या जलकुंभातील पाणी आटल्याने तेथील परिस्थीतीत भयानक झाली आहे. प्रशासनाने येथील पाणीटंचाई दुर करण्यासाठी टॅकरची संख्या वाढवुन पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांसह महिलांनी केली आहे. @ येथील एकलव्य आदिवासी वस्तीत एक जलकुंभ असुन बोअरवेल्सद्वारे दर दोन तासांनी या जलकुंभात अवघे दहा ते बारा हंडे पाणी उपलब्ध होते. पाण्यासाठी रांगेत लावलेला नंबर दुसर्या किंवा तिसर्या दिवशी लागत असल्याने महिलांना कामधंदा सोडून पाणी मिळविण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याचे तेथील महिलांनी बोलुन दाखिवले.
@ फोटो ओळ - उमराणे येथील एकलव्य आदिवासी वस्तीत जलकुंभातुन पाणी मिळविण्यासाठी रांगेत लावलेले हंडे.
@ प्रतिक्रि या - सद्यस्थितीत उमराणे व परिसरातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.प्रशासनाकडुन तिन टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु हा पाणीपुरवठा मागणी पेक्षा कमी होत असल्याने वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सदर वाड्यावस्त्यांवर ग्रामपंचायतीच्या मालकीचे टॅक्ट्ररवरील टॅकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल.
- लताबाई देवरे सरपंच, उमराणे.
 

Web Title:  Terrain water shortage at Umraane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.