टॅँकरग्रस्त गावांची प्रांतांकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:37 AM2017-08-03T00:37:34+5:302017-08-03T00:43:59+5:30
जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांत सरासरी ओलांडणारा विक्रमी पाऊस होऊनही पाच तालुक्यांतील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच असून, शासनाच्या आदेशान्वये ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर बंद केले असले तरी, ऐन पावसाळ्यात भेडसविणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुन्हा टॅँकर सुरू करण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने ज्या गावांना टंचाई भासत आहे अशा गावांची चौकशी करण्याच्या सूचना प्रांत व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्णात गेल्या दोन महिन्यांत सरासरी ओलांडणारा विक्रमी पाऊस होऊनही पाच तालुक्यांतील जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती सुरूच असून, शासनाच्या आदेशान्वये ३१ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने या पाच तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर बंद केले असले तरी, ऐन पावसाळ्यात भेडसविणाºया पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुन्हा टॅँकर सुरू करण्याशिवाय पर्यायच शिल्लक नसल्याने ज्या गावांना टंचाई भासत आहे अशा गावांची चौकशी करण्याच्या सूचना प्रांत व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्णात यंदा पहिल्यांदाच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन झाले व त्यानंतर लगेचच मान्सून दाखल झाला. साधारणत: जून महिन्यात पावसाने आपला मुक्काम ठोकल्याने नद्या, नाले पुन्हा वाहू लागले. संपूर्ण महिन्यात सरासरीपेक्षा ११३ टक्के इतका पाऊस झाला, तर जुलै महिन्यातही पावसाचा जोर कायम राहिल्याने १४७ टक्के विक्रमी पाऊस नोंदविला गेला. जून व जुलै महिन्यात नाशिक जिल्ह्णात झालेल्या पावसामुळे जिल्ह्णातील धरणसाठ्यात ७३ टक्के इतकी वाढ झाल्याने पाणीप्रश्न सुटल्याचे चित्र निर्माण झालेले असताना प्रत्यक्षात मात्र बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर व येवला या पाच तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केइतकाच पाऊस झाला आहे, त्यातही काही विशिष्ट भागातच पाऊस झाल्यामुळे या तालुक्यातील अन्य भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्णात एकीकडे समाधानकार पाऊस पडत असताना दुसरीकडे पाच तालुक्यातील गाव, वाड्यांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना या टॅँकरला ३० जून नंतर जिल्हाधिकाºयांनी एका महिन्याची (दि. ३१ जुलैपर्यंत) मुदतवाढ दिली. या काळात ४३ गावे, २३ वाड्या अशा एकूण ६६ गावांना २६ टॅँकरच्या ९५ फेºयांद्वारे पाणीपुरवठा केला जात होता; मात्र ३१ जुलै रोजी टॅँकरची मुदतवाढ संपुष्टात आल्याने पुन्हा टॅँकर बंद करण्याची वेळ आली. तथापि, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेल्या गावांना टॅँकर सुरू ठेवा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे, अशा गावांमध्ये खरोखरच टॅँकरची गरज आहे काय, हे तपासून पाहण्याच्या सूचना प्रांत तसेच तहसीलदारांना दिल्या आहेत. त्यांच्या अहवालानंतरच टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.