श्वानांच्या वावरामुळे जॉगिंग ट्रॅकवर दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 01:21 AM2019-12-03T01:21:52+5:302019-12-03T01:22:14+5:30
हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये असलेल्या मनपा क्रीडा संकुलानजीक महापालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून काही नागरिक पहाटे पाळीव श्वान घेऊन फिरत असल्याने या ट्रॅकवरच त्यांचे विधी आटोपले जात आहेत.
पंचवटी : हिरावाडीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये असलेल्या मनपा क्रीडा संकुलानजीक महापालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या जॉगिंग ट्रॅकवर गेल्या काही दिवसांपासून काही नागरिक पहाटे पाळीव श्वान घेऊन फिरत असल्याने या ट्रॅकवरच त्यांचे विधी आटोपले जात आहेत. अगोदरच या ट्रॅकला भटक्या श्वानांनी विळखा घातलेला असताना त्यात पाळीव श्वानांची भर पडल्यामुळे ट्रॅकवर दहशत निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने पाळीव श्वान ट्रॅकवर फिरविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त जॉगर्सनी केली आहे.
महापालिका प्रशासनाने हिरावाडीत तयार केलेल्या मातीच्या जॉगिंग ट्रॅकमुळे शेकडो नागरिकांना जॉगिंग ट्रॅकचा मोठा उपयोग होत आहे. प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून केलेल्या ट्रॅकमुळे परिसराच्या विकासातदेखील भर पडली आहे. रोज पहाटे शेकडो महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक ट्रॅकवर फिरण्यासाठी येत असतात. पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत पायी फिरण्यासाठी येणाºया नागरिकांची मोठी गर्दी असते. दरम्यान, याच कालावधीत परिसरात राहणाºया काही नागरिकांकडून जॉगिंग ट्रॅकवर आपल्या पाळीव कुत्र्यांना विधी करून घेण्यासाठी घेऊन येतात. त्यामुळे ट्रॅकवरच या कुत्र्यांचे मलमूत्र टाकले जाते. त्यामुळे सकाळी फिरण्यासाठी येणाºया नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
सूचनांकडे दुर्लक्ष
जॉगिंग ट्रॅकवर श्वान आणणाºया नागरिकांना अडविले तर सदर ट्रॅक महापालिकेचा आहे, आम्ही बघून घेऊ तुम्ही आम्हाला सांगू नका असा वाद घालतात. जॉगिंग ट्रॅक नागरिकांना फिरण्यासाठी असल्याने पाळीव श्वानांना आणू नये, अशी सूचना नागरिकांनी यापूर्वीच करण्यात आलेली दुर्लक्ष होत असल्याने जॉगिंग ट्रॅक नागरिकांसाठी की पाळीव श्वान फिरविण्यासाठी, असा सवाल नागरिकांनी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.