शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:30 AM2020-12-15T04:30:56+5:302020-12-15T04:30:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक: शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम असून, गेल्या ११ महिन्यात ३२० जणांना श्वानदंशाचा फटका बसला ...

The terror of stray dogs in the city; | शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत;

शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत;

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक: शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम असून, गेल्या ११ महिन्यात ३२० जणांना श्वानदंशाचा फटका बसला आहे. सुदैवाने कोणाचाही बळी गेला नसल्याचे मनपाकडून सांगितले जात असले तरी कुत्र्यांमुळे होणारे अपघात जिवावर बेतू शकतात, अशी अवस्था आहे.

नाशिक शहरात भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी ठेका दिला जातो. भटके कुत्रे पकडणे आणि तक्रार असलेल्या भागातूनही कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करणे यासाठी सुमारे १ कोटी रुपयांची तरतूद दरवर्षी केली जाते. सुमारे साडेसहाशे रुपये प्रति निर्बीजीकरण खर्च केला जात असला तरी शहरात खरोखरच कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचे छातीठोकपणे सांगत नाही. दुसरीकडे मात्र रात्री-बेरात्री कुत्र्यांचा त्रास कायम आहे. वर्षभरात ३२० जणांना कुत्रे चावल्याची नोंद आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार बळी मात्र कोणाचाही गेलेला नाही. विशेष म्हणजे चालू वर्षात लाॉकडाऊन सुरू असतानाही ४ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याचा दावा मनपाने केला आहे.

----

कुत्रे पकडण्यासाठी

तीन व्हॅनची व्यवस्था

नाशिक महापालिकेच्या वतीने कुत्रे पकडणे आणि निर्बीजीकरण करण्याच्य कामाचा ठेका दिला जातो आणि त्या ठेकेदारामार्फत गरजेनुसार डाॅग व्हॅनमध्ये कुत्रे पकडण्याची व्यवस्था केली जाते. सध्या साधारण तीन व्हॅन शहरात कुत्रे पकडण्यासाठी आहेत.

-----

शस्त्रक्रिया केलेले कुत्रे पुन्हा तेथेच

महापालिकेच्या नियमानुसार कुत्रे पकडून कोठेही सोडले जात नाहीत तर त्यांच्यावर निर्बीजीकरण केल्यांनतर कुत्र्यांना जेथून पकडले त्याच ठिकाणी आणून सोडले जाते, असा महापालिकेचा दावा आहे. प्रत्यक्षात मात्र पांडवलेणी, विल्होळी भागात कुत्रे सोडून दिल्या जात असल्याच्याही ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.

------------------

या प्रमुख भागांत त्रास : वडाळा गाव, राजीव नगर, इंदिरा नगर, श्री श्री रविशंकर मार्ग, शालीमार, पखालरोड, गंजमाळ, व्दारका, महालक्ष्मी चाळ, शिंगाडा तलाव, गौळाणे फाटा, त्रिमूर्ती चौक, पेठरोड, सिडकोतील शिवाजी नगर, लेखा नगर, आयटीआय सिग्नल, आनंदवल्ली, सातपूर गाव, तिबेटियन मार्केट, पंचवटी कारंजा, नाशिक राेड येथील गोरेवाडी, सैलानी बाबा, सुभाष रोड.

--------------

भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो. या कुत्र्यांना राेखण्यात महापालिका अपयशी आहे; परंतु अनेक ठिकाणी उघड्यावरील मांस विक्रेते किंवा भूतदया म्हणून कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांमुळेदेखील अनेक चौकात कुत्रे ठाण मांडून आहेत.

- रेशमा पाटील, महात्मा नगर

Web Title: The terror of stray dogs in the city;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.