दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 01:19 AM2019-02-17T01:19:00+5:302019-02-17T01:19:17+5:30
मालेगाव : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व दहशतवादी मसुद अजहर याला अटक करावी या मागणीसाठी शहर व तालुक्यात धरणे आंदोलन, गावबंद व कँडल मार्च काढण्यात आला. शहीद जवानांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बागलाण तालुका शिवसेनेतर्फे प्रतिकात्मक पुतळ्यासह पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाची होळी करतांना शिवसैनिक.
मालेगाव : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व दहशतवादी मसुद अजहर याला अटक करावी या मागणीसाठी शहर व तालुक्यात धरणे आंदोलन, गावबंद व कँडल मार्च काढण्यात आला. शहीद जवानांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
टेहरेला कडकडीत बंद
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील टेहरे येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
ग्रामस्थांनी पेटत्या मेणबत्त्या हातात घेऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. दिवसभर छत्रपती शिवाजी मार्केटसह गावातील दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आली होती.
भारिप बहुजन महासंघ
पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन सेनेच्या वतीने कॅँडल मार्च काढण्यात आला. मोसमपुलावरील महात्मा जोतिबा फुले पुतळ्यापासून कॅँडल मार्चला सुरुवात झाली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
चांदवडला कडकडीत बंद
चांदवड : शहरातून पकिस्तान मुर्दाबाद, शहीद जवान अमर रहे, पाकिस्तानला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही या घोषणा देत शहरातून प्रचंड मोठी रॅली काढण्यात आली तर या रॅलीनंतर श्रद्धांजली सभा, निषेध सभा होऊन शिवाजी चौकात दहशतवादी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून चांदवड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. चांदवड येथील नगर परिषदेजवळ सकाळी साडेवाजता सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची सांगण्यात आले. यावेळी घोषणा देत कार्यकर्ते व नेते वरचेगाव, शिंपी गल्ली, श्रीरामरोड, गुजराथ गल्ली, सोमवारपेठ, शिवाजी चौकात आले. तेथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल अहेर, चंद्रेश्वर गडाचे महंत जयदेवपुरी महाराज, भूषण कासलीवाल, जगन्नाथ राऊत उपस्थित होते.