दहशतवाद्यांना सोशल मीडियामुळे बळ

By admin | Published: January 31, 2015 12:54 AM2015-01-31T00:54:59+5:302015-01-31T00:55:09+5:30

विजय भटकर : ईएसडीएस आयटी कंपनीच्या भेटीप्रसंगी प्रतिपादन; कायद्याची जरब बसविण्याची गरज

The terrorists are strengthened by social media | दहशतवाद्यांना सोशल मीडियामुळे बळ

दहशतवाद्यांना सोशल मीडियामुळे बळ

Next

नाशिक : दहशतवादाला लगाम घालण्यासाठी जितके पर्याय समोर येत आहेत, तितक्याच दहशतवादाच्या वाटाही पसरत जात आहेत. त्यामध्ये सोशल मीडिया दहशतवाद्यांना बळ देणारे ठरत असून, या माध्यमातून भारतविरोधी कारवाया गतिमान करणे दहशतवाद्यांना सहज शक्य होत आहे. यावर जर नियंत्रण ठेवायचे असेल तर सोशल मीडियावर भारतीय पॉलिसी व कायद्यांची जरब बसविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी केले.
सातपूर येथील ईएसडीएस आयटी कंपनीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमानी, विशाल जोशी, नितीन कापडणीस, अविनाश राय, कोमल सोमानी, आशिष कुमार, हर्नाम सिंग आदि उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. भटकर म्हणाले की, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारखी लोकप्रिय माध्यमे विदेशातून हाताळली जातात. त्यामुळे या माध्यमांवर सक्रिय असलेल्या भारतविरोधी शक्तीचा आपणास सहजासहजी विमोड करता येत नाही. शिवाय एकट्या फेसबुकवर ३५ ते ४० टक्के भारतीय यूजर्स असल्याने मोठ्या प्रमाणात भारतीय चलन परदेशात जात आहे. गार्डनर यांच्या सर्व्हेनुसार २०१४ मध्ये व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांचा महसूल विदेशात गेला असून, यामध्ये दरवर्षाला ३० टक्क्यांनी वाढ होत आहे, तर हीच माध्यमे भारतात असती तर कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला असता. शिवाय भारतविरोधी दहशतवादी कारवायांवर रोख लावण्यातही आपल्याला यश आले असते. व्हॉट्स अ‍ॅप या माध्यमाचे संपूर्ण अधिकार १९ बिलीयन डॉलरला विकले गेले, ऐवढी रक्कम खर्च करण्याची भारतीयांमध्ये क्षमता आहे. मात्र इच्छाशक्ती नसल्याने सोशल मीडियांवरील वाढता दहशतवाद भारतासमोर आवाहन ठरत असल्याचेही डॉ. भटकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा अडवानी यांनी केले.

Web Title: The terrorists are strengthened by social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.