कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 

By अझहर शेख | Published: October 30, 2024 05:23 AM2024-10-30T05:23:02+5:302024-10-30T05:24:31+5:30

दोन वर्षांपूर्वी दिग्विजयला कॅनडात एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर नोकरी मिळाली होती.

Tesla car explodes in Canada accident; Digvijay Ausarkar, Youth of Nashik death, identified through DNA  | कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 

कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 

नाशिक : कॅनडाच्या टोरॅन्टो शहरामध्ये गुरूवारी (दि.२४) रात्रीच्या सुमारास नवीन टेस्ला कारचा अपघातात स्फोट होऊन लागलेल्या आगीत चौघा युवकांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिकच्या इंदिरानगरमधील दिग्विजय राजेंद्र औसरकर (३०,रा. एका-१गृहप्रकल्प, इंदिरानगर) याचा जळून मृत्यू झाला. त्याचे वडील व बहीण नाशिकहून कॅनडात गेल्यानंतर डीएनएद्वारे दिग्विजयची ओळख कॅनडा पोलिसांना पटविण्यास यश आले. या दुर्घटनेने औसरकर कुटुंबावर दिवाळीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दोन वर्षांपूर्वी दिग्विजयला कॅनडात एका मोठ्या कंपनीत उच्चपदावर नोकरी मिळाली होती. त्याने अमेरिकेतून मॅकेनिकल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले होते. तेथील विद्यापिठाने त्यास ब्रॅन्ड ॲम्बेसेडर केले होते. नोकरीनिमित्त तो कॅनडात स्थायिक होता. पंधरा दिवसांपूर्वीच त्याचे आई, वडील हे त्याला भेटून भारतात नाशिक येथे परतले होते. २४ तारखेला झलक पटेल या त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने गुजरातचे केता गोहली, नील गोहली हे भाऊ-बहिणींसह चौघे जण वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री टोरॅन्टो शहरात एकत्र जमले. त्यांच्या एका मित्राने नवीनच टेस्ला कार खरेदी केल्यामुळे वाढदिवस सेलिब्रेशन आटोपून हे चौघे जण ‘टेस्ट ड्राइव्ह’ला बाहेर पडले. 

यावेळी अचानकणे एका गतिरोधकावरून कार उलटली अन् रस्त्यांलगत असलेल्या लोखंडी गल्डरवर जाऊन आदळली. यावेळी कारने पेट घेतला अन् काही मिनिटांतच मोठा स्फोट झाला. या अपघातात सुदैवाने बर्थ डे गर्ल झलकचे प्राण एका जागरूक ट्रक ड्रायव्हरने दाखविलेल्या धाडसामुळे वाचू शकले, असे सुत्रांनी सांगितले. दिग्विजय हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, दाजी, चुलत भाऊ असा परिवार आहे. बुधवारी (दि.३०) येथील लोट्स नावाच्या विद्यूत दाहिनी स्मशानभूमीत दिग्विजयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्याचे चुलतबंधू केतन औसरकर यांनी सांगितले.

कॅनडा सरकारकडून सपोर्ट नाही मिळाला. दु:खद घटनेतही जवळच्या नातेवाईकांना व्हिसा नाकारला गेला. सुदैवाने यामुळे केवळ त्याचे वडील राजेंद्र औसरकर व बहिण स्वामिनी औसरकर यांचा व्हिसा हा संपलेला नव्हता; यामुळे त्यांना कॅनडाला जाता आले. दोन देशांमधील ताणले गेलेल्या संबंधाचा फटका यावेळी जाणवला.
- केतन औसरकर, दिग्विजयचे चुलत बंधू.
 

Web Title: Tesla car explodes in Canada accident; Digvijay Ausarkar, Youth of Nashik death, identified through DNA 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.