नांदगावी शेतकऱ्यांसाठी उभारले चाचणी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:15 AM2021-05-25T04:15:51+5:302021-05-25T04:15:51+5:30
नांदगाव : नांदगाव व बोलठाण या दोन्ही बाजार समितींच्या आवारात शेतमाल लिलावाला सुरूवात करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांची कोविड चाचणी ...
नांदगाव : नांदगाव व बोलठाण या दोन्ही बाजार समितींच्या आवारात शेतमाल लिलावाला सुरूवात करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांची कोविड चाचणी घेण्यात येऊन प्रवेश देण्यात आला. नांदगाव आवारात १८२ ट्रॅक्टर वाहनांचा लिलाव झाला. त्यात आवारात एकूण १२४ शेतकऱ्यांची चाचणी करण्यात आली तर ५८ शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये येण्यापूर्वीच चाचणी केली होती.
बोलठाण आवारात एकूण १२२ ट्रॅक्टर वाहनांचा लिलाव झाला. त्यात यार्डवर ७० शेतकऱ्यांची चाचणी करण्यात आली. दोन्ही आवारांच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी व पोलिसांनी हजर राहून चाचणी प्रमाणपत्राची पाहणी केली. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नव्हते, त्यांची यार्डामध्येच खासगी लॅबकडून करण्यात येत असलेल्या चाचणी केंद्रावर चाचणी करण्यात आली.
नांदगाव व बोलठाण यार्डांचे प्रवेशद्वारावरच सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या अँटिजन तपासणीकरिता नांदगाव व बोलठाण यार्डवर खासगी लॅबकडून तपासणी केंद्र उभारले आहे. या खासगी लॅबकडे पुरेसे तपासणी किट उपलब्ध आहेत. बाजार समितीतील लिलावाच्या पहिल्या दिवशी कांद्याचे भाव किमान ५०० तर कमाल १,६२५ तर सरासरी १,३५५ रुपये प्रतिक्विंटल राहिले.
कोट...
कोरोना चाचणी केल्यानंतरच बाजार समितीमध्ये मालाची विक्री करता येईल, ही अट जाचक वाटत असली तरी बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाल्याने व बाजारभावात सुधारणा झाल्याने समाधान वाटले. यापूर्वी व्यापाऱ्यांच्या खळ्यावर योग्य बाजारभाव शेतकऱ्यांना मिळाला नाही. बाजार समितीने योग्य नियोजन केल्यामुळे जास्त गर्दी झाली नाही.
- नंदू रामकर, शेतकरी, माणिकपुंज
कोट...
आमचा देशावरील व्यापार बंदावस्थेतच होता. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांचेही नुकसान होत होते. बाजार समित्या सुरु झाल्याने व बाजार समिती प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने आजचे लिलावाचे काम गर्दी न होता सुरळीत पार पडले. आवक योग्य प्रमाणात असल्याने कांदा बाजारभावात सुधारणा झाली. आगामी काळातही बाजारभावात थोड्याफार प्रमाणात तेजी येण्याची शक्यता आहे.
- भूषण धूत , कांदा व्यापारी, नांदगाव
फोटो- २४ नांदगाव ट्रॅक्टर
नांदगाव बाजार समितीमध्ये शिस्तबध्द पद्धतीने उभे असलेले ट्रॅक्टर
===Photopath===
240521\24nsk_8_24052021_13.jpg
===Caption===
फोटो- २४ नांदगाव ट्रॅक्टर नांदगाव बाजार समितीमध्ये शिस्तबध्द पद्धतीने उभे असलेले ट्रक्टर