देवळ्यात ग्राहक दिनाच्या बैठकीकडे अधिकाऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:09 AM2018-03-17T01:09:41+5:302018-03-17T01:09:41+5:30
ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ग्राहकांना फारशी माहिती नसल्याने फसवणूक झाल्यावर काय करावे? याबाबत असलेल्या अज्ञानामुळे तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत नाही. ग्राहकांना उत्पादन व बाजारपेठेबाबत साक्षरता यावी यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ग्राहक संरक्षण कायद्यासंबंधी माहिती देणारा फलक लावण्यात येईल, असे प्रतिपादन तहसीलदार कैलास पवार यांनी केले. देवळा येथे जागतिक ग्राहक दिनानिमित्त झालेल्या बैठकीत ते बोलत होते. वीज वितरण कंपनी, तालुका कृषी कार्यालय, वैध मापन आदी ग्राहकांशी सर्वाधिक संबंध येणाºया कार्यालयांसह इतर शासकीय कार्यालयांतील एकही अधिकारी वा कर्मचारी ग्राहक दिनास उपस्थित नव्हता.
देवळा : ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ग्राहकांना फारशी माहिती नसल्याने फसवणूक झाल्यावर काय करावे? याबाबत असलेल्या अज्ञानामुळे तक्रार करण्यास ग्राहक पुढे येत नाही. ग्राहकांना उत्पादन व बाजारपेठेबाबत साक्षरता यावी यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ग्राहक संरक्षण कायद्यासंबंधी माहिती देणारा फलक लावण्यात येईल, असे प्रतिपादन तहसीलदार कैलास पवार यांनी केले.
देवळा येथे जागतिक ग्राहक दिनानिमित्त झालेल्या बैठकीत ते बोलत होते. वीज वितरण कंपनी, तालुका कृषी कार्यालय, वैध मापन आदी ग्राहकांशी सर्वाधिक संबंध येणाºया कार्यालयांसह इतर शासकीय कार्यालयांतील एकही अधिकारी वा कर्मचारी ग्राहक दिनास उपस्थित नव्हता. ग्राहकांप्रती असलेली शासकीय अधिकाºयांची अनास्था यातून प्रकट झाली. येथील नवीन प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार कैलास पवार यांच्या उपस्थितीत जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी देवळा तालुका ग्राहक पंचायतीचे संघटक संजय मांडगे, सहसंघटक संजय देवरे, निंबाजी अहेर, हेमंत जोशी, सनी परदेशी, मोबीन तांबोळी, बाबा पवार, राजपाल अहीरे, संजय भदाणे, शशिकांत चितळे आदि ग्राहक मंचचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक संजय देवरे यांनी केले. यावेळी गॅस एजन्सी, बँक, मुद्रांक विके्रते, खते व बी-बियाणे विक्र ेते यांच्याकडून ग्राहकांची होणारी अडवणूक व फसवणुकीबाबत चर्चा करण्यात आली. गॅस एजन्सीकडून घरपोच सिलिंडर सेवा देण्याच्या नावाखाली ग्राहकांच्या होणाºया फसवणुकीबाबत एजन्सीच्या कर्मचाºयांशी चर्चा करण्यात आली. गॅस एजन्सीपासून २० कि.मी. अंतराच्या आतील ग्राहकांना नियमानुसार आजच्या दरानुसार सिलिंडर ६९८ रुपये दराने द्यावे, ग्राहकांंकडून घरपोहोच सेवा देण्याच्या नावाखाली अतिरिक्त २० ते ३० रूपये घेतले जातात ते घेउ नये, तशा माहितीचे दर पत्रक एजन्सीने दर्शनी भागात लावावेत, अशी सूचना तहसीलदार पवार यांनी केली. ग्राहकांचे हित जपण्यासाठी शासनस्तरावरून योग्य ते सहकार्य केले जाईल, असेही आश्वासन तहसीलदारांनी यावेळी दिले. ग्राहक दिनास अनुपस्थित असलेल्या विभागांंचा आढावा त्यांनी घेतला. बैठकीला पुरवठा विभागाचे कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, रॉकेल विक्र ेते, आदी उपस्थित होते.