बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 01:12 AM2018-07-15T01:12:50+5:302018-07-15T01:13:07+5:30

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे़ या ठिकाणाहून २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे निर्मिती आणि बोटलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणी संशयित घरमालक जाड्या हैदऱ्या पावरा व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

 Texture liquor factory seal | बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना सील

बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना सील

googlenewsNext
ठळक मुद्देकारवाई : शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारातील कारखाना

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यातील जोयदा शिवारात सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे़ या ठिकाणाहून २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे निर्मिती आणि बोटलिंगचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ या प्रकरणी संशयित घरमालक जाड्या हैदऱ्या पावरा व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांना जोयदा येथील लालमाती शिवारात बनावट मद्य निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नाशिकच्या विभागीय भरारी पथकाने या ठिकाणी छापा टाकला़ यावेळी तयार देशी दारूचे २०० लिटरचे दोन बॅरल, बॉटलिंग मशीन, इलेक्ट्रिक मोटार तसेच डबल बॉटलिंग मशीनसह इलेक्ट्रिक मोटार, डिझेल जनरेटर, टॅगो पंच नावाचे ५ हजार बोटलिंग बुचचे (झाकण) संत्रा देशी दारूचे पाच हजार लेबल, रॉकेट संत्रा दारूचे शंभर रिकामे कागदी बॉक्स, ३ लिटर इन्सेस, एक हजार लिटर क्षमतेचे दोन बॅरल, रिकामे प्लॅस्टिक बॅरल असा एकूण २ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title:  Texture liquor factory seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.