नाशिकचे पुरोहित ठाकरे यांच्या भेटीला!

By Admin | Published: January 4, 2017 12:13 AM2017-01-04T00:13:11+5:302017-01-04T00:13:28+5:30

आयकर प्रकरणी नाराजी : भाजपाच्या मतपेढीला धक्का

Thackeray's visit to Nashik | नाशिकचे पुरोहित ठाकरे यांच्या भेटीला!

नाशिकचे पुरोहित ठाकरे यांच्या भेटीला!

googlenewsNext

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितांच्या घरांवर पडलेल्या आयकर छाप्यामुंळे नाराज झालेल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितांनी सोमवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि केवळ पुरोहितांना लक्ष्य केले जात असल्याची तक्रार केली. त्यामुळे आयकर प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, भाजपाची समर्पित मतपेढी मानले जाणाऱ्यांनी आता उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपासाठी धक्का मानला जात आहे.   नोटाबंदीनंतर आयकर विभागाने विविध व्यापारी आणि नोटा बदलून देणाऱ्या अन्य व्यक्तींवर छापे टाकले त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील दोन पुरोहितांवरही छापे टाकले होते. तसेच या भागातील नऊ पुरोहितांना नोटिसा बजावल्या होत्या. पुरोहितांच्या धनस्थानात सरकारच वक्री होऊन वास करीत असल्याची चर्चा पसरली होती.  भेट घेणाऱ्यांमध्ये पुणे येथील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित देशपांडे, जिल्हाध्यक्ष आनंद दवे, अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासंघाचे अध्यक्ष अनंत जोशी, त्र्यंबकेश्वर येथील प्रशांत गायधनी, यजुस दीक्षित, विशाल जोशी, नीलेश जोशी, मंगेश धारणे, अरविंद नाकील, नीरज शिखरे, सचिन शुक्ल, गिरीश लोहगावकर, सुयोग वाडेकर, सुयोग शिखरे, आनंद जोशी, नाशिकचे हेमंत तळाजीया, दत्तात्रेय भानोसे, वेदमूर्ती गायधनी, पंडित वैभव दीक्षित राहुल दराडे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)








 

Web Title: Thackeray's visit to Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.