अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 10:39 PM2018-07-19T22:39:15+5:302018-07-20T00:16:17+5:30

नाशिक : महानगरपालिका क्षेत्रातील १३६ अंगणवाड्या कायमस्वरूपी बंद करण्याच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविकांनी गुरुवारी (दि.१९) महापालिकेच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करीत महापालिका व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Thalinad of Anganwadi Sevikas | अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद

Next
ठळक मुद्देमनपासमोर आंदोलन

नाशिक : महानगरपालिका क्षेत्रातील १३६ अंगणवाड्या कायमस्वरूपी बंद करण्याच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविकांनी गुरुवारी (दि.१९) महापालिकेच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करीत महापालिका व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
महापालिका प्रशासनाकडून महानगरपालिका क्षेत्रातील १३६ अंगणवाड्या कायमस्वरूपी बंद करून गरीब विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप अंगणवाडीसेविकांनी केला आहे. या निर्णयाच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी भारतीय हितरक्षक सभेच्या माध्यमातून महापालिकेसमोर आंदोलन करीत अंगणवाडी बंद करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.
दरम्यान, भारतीय हितरक्षक सभेच्या किरण मोहिते यांच्या नेतृत्वाखाली स्मिता साळवे, लता पवार, मंदा येलमामे, रश्मी गांगुर्डे, सूक्ष्मा खांबेकर, लीला शेवाळे आदी अंगणवाडी सेविका व मदतनिसांसह कृष्णा शिंदे, भागवत गांगुर्डे, संदीप कोळे, शरद जाधव, दीपक गांगुर्डे, मदन पालवे, ज्ञानेश्वर भालेराव आदींनी आंदोलनात सहभाग घेऊन महापालिका व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
अंगणवाडी बंद होत असल्याचा आरोप
अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार असल्याने महापालिकेच्या निर्णयाविरोधात भारतीय हितरक्षक सभेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका एकवटल्या असून, या निर्णयाविरोधात सेविका व मदतनीस यांनी संताप व्यक्त करताना महापालिका अन्यायकारक पद्धतीने अंगणवाडी शाळा बंद करीत असल्याचा आरोप केला. दरम्यान, महापालिकेतून गटनेते अजय बोरस्ते, सलीम शेख, गजानन शेलार, वत्सला खैरे, हेमलता पाटील, विलास शिंदे आदी नगरसेवकांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर थाळीनाद आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Thalinad of Anganwadi Sevikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.