रस्ता भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यासाठी थाळीनाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:27 AM2019-02-14T00:27:40+5:302019-02-14T00:29:17+5:30
नाशिक : रस्ता कामांची प्रत्यक्ष पाहणी न करता न केलेल्या कामांसाठी जिल्हा परिषदेने ठेकेदारास ३० लाखांची देयके अदा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी युवा सेनेच्या माध्यमातून थाळीनाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
नाशिक : रस्ता कामांची प्रत्यक्ष पाहणी न करता न केलेल्या कामांसाठी जिल्हा परिषदेने ठेकेदारास ३० लाखांची देयके अदा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी युवा सेनेच्या माध्यमातून थाळीनाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
त्र्यंबकरोडवरील गोल्फ क्लब मैदानावर युवा सेनेचे तालुकाप्रमुख मिथुन राऊत, संपतराव सकाळे, विनायक माळेकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या रूपांजली माळेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी थाळीनाद करण्यात आला. त्यानंतर उपोषणास सुरुवात झाली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा रस्ता सुधारणा करणे व बोरपाडा ते वरसविहीर रस्ता सुधारणा या दोन्ही कामांसाठी प्रत्येकी १५ लाख बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांनी देयके मंजूर केलेली आहेत. सदर काम प्रत्यक्ष साईटवर न करता सार्वजानिक बांधकाम विभागांचे झालेले काम दाखवून जिल्हा परिषदेने बिल अदा केले आहे. यात संबंधित ठेकेदारांनी शासनाची व जिल्हा परिषदेची फसवणूक केली आहे. सदर दोषी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दोन गावांना जोडणाºया रस्त्याची कामे न करता थेट देयके अदा करणाºया दोषींवर कारवाई न केल्याने आक्रमक झालेल्या त्र्यंबक युवा सेना व विनायक माळेकर यांनी बेमुदत थाळीनाद आंदोलन केले. कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका माळेकर यांनी घेतली आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नेरश गिते यांना निवेदनही देण्यात आले आहे. यापूर्वीच माळेकर यांनी डॉ. गिते यांना पत्र दिलेले आहे. मात्र, प्रशासनाकडून केवळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. याव्यातिरिक्त कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे माळेकर यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे तक्र ार केली होती. मात्र, कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने, तालुक्यातील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले असल्याचे मिथुन राऊत यांनी सांगितले. आंदोलनात प्रवीण तुंगार, परशराम मोंढे, अंबादास बेंडकोळी, अजित सकाळे, निसर्गराज सोनवणे, अंबादास बोरसे, जगन पिंपळके, विलास चौधरी, पोपट बेंडकोळी, विठ्ठल पवार, प्रदीप माळेकर, धोंडीराम डगळे, अशोक लांघे, विष्णू बेंडकोळी, योगेश आहेर आदी सहभागी झाले होते. कामे पूर्णत्वाचा पुरावा द्याज्या रस्त्यासाठी देयक अदा करण्यात आले आहे त्यासाठीची जी कार्यवाही करण्यात आली त्यामध्ये पाहणी रिपोर्ट, पूर्णत्वाचा दाखला, रस्त्याचे छायाचित्र याची माहिती माळेकर यांनी जिल्हा परिषदेकडे मागितली आहे. देयके कोणत्या आधारे देण्यात आली याचे सक्षम कारण सादर करावे, अशी ठाम मागणी माळेकर यांनी लावून धरली आहे.