मनसेच्या वतीने थाळीनाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:15 AM2018-02-26T01:15:40+5:302018-02-26T01:16:33+5:30
नाशिक महापालिकेच्या महासभेत घरपट्टीत ३३ टक्के कर वाढीस मंजुरी देण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिकरोड महापालिका विभागीय कार्यालयासमोर थाळीनाद निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच विभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
नाशिकरोड : नाशिक महापालिकेच्या महासभेत घरपट्टीत ३३ टक्के कर वाढीस मंजुरी देण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिकरोड महापालिका विभागीय कार्यालयासमोर थाळीनाद निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच विभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनपाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनामध्ये मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश कोरडे, उपजिल्हाध्यक्ष संतोष सहाणे, उपशहराध्यक्ष संतोष क्षीरसागर, अस्लम मणियार, महिला आघाडी शहराध्यक्ष रिना सोनार, भानुमती आहिरे, साहेबराव खर्जुल, सचिन सिसोदिया, प्रवीण पवार, भाऊसाहेब ठाकरे, अतुल धोंगडे, श्याम गोहाड, अमर जमदडे, नितीन पंडित, नितीन धान-पुणे, संदीप आहेर, पंकज सोनवणे, तुषार वाडीले, स्वप्नील विभांडिक, आदित्य कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.
तसेच नाशिकरोड महापालिका विभागीय अधिकाºयांना निवेदन देऊन वाढीव कर तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
काळ्या फिती लावून निषेध
मनपाने घरपट्टीत ३३ टक्के केलेली दरवाढ ही अयोग्य असून, ती त्वरित मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी सकाळी मनपा विभागीय कार्यालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या फिती बांधून थाळीनाद निषेध आंदोलन केले.