ठाणापाडाच्या आदिवासी विद्यार्थ्यांची गगनभरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 12:38 PM2020-01-06T12:38:07+5:302020-01-06T12:38:30+5:30
पेठ : ठाणापाडा येथील आदिवासी विकास विभागाची आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना हवाई सफर घडविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.
पेठ : ठाणापाडा येथील आदिवासी विकास विभागाची आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना हवाई सफर घडविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.
शिक्षणाच्या प्रवाहात कोणीही मागे राहू नये म्हणून शाळा विविध प्रकल्प राबवत आहे. परिस्थितीमुळे आपण शिकलो नाहीत मात्र आपली मुलं शिकावेत असा संकल्प करणा-या पालकांच्या पाल्यांना हवाई सफरीचा आनंद अधीक्षक अरु ण बागले यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने घेतला.तळागाळातील विद्यार्थ्यांच्या अभिजात स्वप्नांना उंच भरारी देत नाशिक ते पुणे अशी अनोखी हवाई सफर घडवण्याचे स्वप्न शाळेचे मुख्याध्यापक अशोक चौरे व शिक्षक अधीक्षक अरु ण बागले,राजेंद्र पाईकराव,ए बी झरिवाळ,ज्योती वाघचौरे,कामाठी कमलबाई शिंदे ,विकास आवारी,प्रकाश डोंगराळे यांनी पूर्ण केले.विमान प्रवास करणाºया आश्रमशाळेच्या ऐतिहासिक सहलीला व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य शासकीय आश्रमशाळा यांनी शुभेच्छा दिल्या.
सहलीत ३५ विद्यार्थी सात शिक्षक यामध्ये होते. नाशिक ते पुना विमान प्रवास पुन्हा येथे विमानतळ ओळख, विजय स्तंभ (भिमा कोरेगाव), छञपती संभाजी राजे यांची समाधी (वळु) राष्ट्रीय युद्ध स्मारक व संग्रालय,(घोरपडी),आगाखान पॅलेस,फोनेक्स मॉल्स तसेच पुणे ते मुंबई (रेल्वे) मुंबईत चैत्यभुमी दादर, टाटा सामाजिक विज्ञान संस्थान देवणार,गेटवे आॅफ इंडीया, सिएसटी, हॉटेल ताज ,मंञालय व गिरगाव चौपाटी अशा शैक्षणिक, भौगोलिक, वैज्ञानिक, ऐतिहासिक, राजकीय व धार्मिक ठिकानांणा भेट देऊन विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद व अनुभव घेतला.
---------------------
माझ्या गावात जाण्यासाठी रस्तादेखील नाही.बस शिवाय मी अजुन दुसºया वाहनाने प्रवास देखील केला नव्हता. विमानाचे तर खुपच उत्सुकता होती.मात्र विमानप्रवास माङया आयुष्यभरासाठी लक्षात राहील.
-आरती अवतार ,विद्यार्थिनी.