ठाणगाव येथे थंडीमुळे जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 05:08 PM2019-01-04T17:08:55+5:302019-01-04T17:09:55+5:30
सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील डोंगराळ भागात असलेल्या ठाणगाव परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून थंडीची लाट आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या थंडीचा परिणाम पिकांवर व जनावरांवर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आठ दिवसापासून परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे. नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर मफरल, कानाटोपी आदीचा वापर करतांना दिसत आहे. थंडीचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर मोठया प्रमाणात झालेला दिसून येत आहे. ठाणगाव परिसर हा पाण्याच्या भाग म्हणून ओळखला जातो, मात्र या हंगामात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही. शेतक-यांनी आपल्या जवळील पशुधन वाचविण्यासाठी शेतात कमी पाण्यात येणारी मका, ज्वारी व बाजरी ही चा-याची पिके घेतली. गेल्या आठ दिवसांपासून सतत पडणाºया थंडीमुळे शेतातील ज्वारी पिकावर त्याचा परिणाम झाला आहे. जनावरांसाठी घेतलेल्या चाºयाच्या पिकावरही संकट आल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शासनाने पशुधन वाचविण्यासाठी शेतकºयांना चारा उपल्बध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.