ठाणगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन
By admin | Published: February 10, 2017 12:13 AM2017-02-10T00:13:30+5:302017-02-10T00:13:40+5:30
ठाणगाव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन
येवला : तालुक्यातील ठाणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहाच्या वातावरणात शाळेच्या प्रांगणात संपन्न झाले. या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य, नाटिका, कावडी आदि प्रकारातील देवा श्रीगणेशा, बानुबया, आई आंबे, वीर शिवबा, झगमग, चला जेजुरीला जाऊ, वीर शिवबा, दूरच्या रानात...., सुनो गोरसे दुनियावाले, भारत माता की जय, देश रंगीला, ललाटी भंडार, यमुनेच्या तीरी, भाऊ मना सम्राट खानदेशी नृत्य, प्लॅस्टिकमुक्त भारत पथनाट्य आणि मुरळी बालपणाची कावडी इत्यादि प्रकार सादर करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अशोक कुमावत, कवी भास्कर चव्हाण, भाऊसाहेब कापरे, रागिणी बोटके, कल्पना माने आदि शिक्षकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्र मप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत शेळके, पांडुरंग कोंढरे, सोपान शेळके, संजय शेळके, सुनील जाधव, बाबासाहेब शेळके, विष्णू कोंढरे, फकिरा शेळके, शिवाजी शेळके, गोरख घुसळे, अरु ण शेळके, शिवाजी शेळके, विष्णू भवर, धोंडीराम जाधव, विष्णू शेळके, नवनाथ शेळके, शंकर शेळके, किशोर शेळके, देवीदास शेळके, रवींद्र शेळके, गणपत भवर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
कवी भास्कर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दिव्या भवर व सपना नेहरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)