जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत ठाणगाव शाळा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 10:43 PM2017-12-14T22:43:36+5:302017-12-15T00:22:49+5:30
तालुक्यातील पाटोदा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या. या स्पर्धेत पाटोदा केंद्रातील पंधरा शाळांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गायकवाड यांनी केले. येवला तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी या स्पर्धेचे औचित्य साधत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याचे एकमेव व्यासपीठ अध्यक्ष चषक स्पर्धा असल्याचे प्रतिपादन केले.
येवला : तालुक्यातील पाटोदा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या. या स्पर्धेत पाटोदा केंद्रातील पंधरा शाळांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गायकवाड यांनी केले. येवला तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी या स्पर्धेचे औचित्य साधत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याचे एकमेव व्यासपीठ अध्यक्ष चषक स्पर्धा असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमप्रसंगी सरपंच सुनीता मेंगाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक अशोक कुमावत, संतोष लोहकरे, सखाराम सोनवणे, नारायण डोखे, एकनाथ इंगळे, भास्कर पवार, योगीता आहेर व ज्योती कुळधर आदी शिक्षकांनी कार्यक्रम संयोजनासाठी परिश्रम घेतले. अशोक कुमावत यांनी सूत्रसंचालन केले. भास्कर चव्हाण यांनी आभार मानले.
स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे
१०० मीटर धावणे (मुली)- सुजाता सोनवणे विसापूर (प्रथम), राणी खुरसणे कानडी , ज्ञानेश्वरी आहेर पाटोदा क्रमांक २- वैयक्तिक गायन - श्रुती शेळके ठाणगाव , नितीन संत कातरणी , वैशाली काळे कानडी , समूह गीतगायन- ठाणगाव, पाटोदा क्रमांक-१, श्रीरामनगर.
नृत्य- समीक्षा भवर ठाणगाव, पूनम शेळके चिंचमळा, सुहानी झेंडे कानडी. समूहनृत्य स्पर्धा- कानडी, ठाणगाव .
मोठा गट
वक्तृत्व- काजल चव्हाण ठाणगाव , करण गोडसे बिजलाईनगर , चित्रकला- ऋतिका शेळके ठाणगाव, गायत्री सोनवणे विसापूर, अभिजित कुºहाडे कातरणी. क्रीडा- चारशे मीटर धावणे (मुले) अमोल पवार विसापूर, प्रथमेश कदम कातरणी, प्रसाद कव्हात ठाणगाव. दोनशे मीटर धावणे (मुली)
ऋतुजा सूर्यवंशी ठाणगाव , मुक्ता कुदळ पिंपरी, पूजा आहेर कातरणी, खो खो (मुले), ठाणगाव, कातरणी खो खो (मुली) ठाणगाव, कातरणी कबड्डी (मुले) ठाणगाव, कातरणी कबड्डी विसापूर, ठाणगाव वैयक्तिक गायन- विद्या भवर ठाणगाव, श्रावणी भोसले पिंपरी. वैयक्तिक नृत्य- अक्षदा भवर ठाणगाव, समूहगायन- पिंपरी, ठाणगाव समूहनृत्य- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- ठाणगाव.