ठाणगावच्या भरला आठवडे बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 05:21 PM2020-01-05T17:21:52+5:302020-01-05T17:23:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा :गोरख घुसळे-ओ ताई ...ओ बाबा इकड या भाजी घ्या भाजी .....! ताजी ताजी भाजी ,गरम गरम भजे घ्या गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू घ्या व आजाराला दूर ठेवा ..... ठाणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्याचे आवाज ऐकून पालकांबरोबर ग्रामस्थही भारावले,व चिमुकल्यांचे व्यवहार ज्ञान पाहून पालकांच्या चेह्नयिावरील आनंद द्विगुणीत झाला व त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.. निमित्त होते .दप्तर मुक्त शनिवारी शाळेत नाविन्यपूर्ण कार्यक्र मा निमित्त भरलेल्या आठवडे बाजाराचे .
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून व कृतीतून विद्यार्थ्यांना बाह्य जगाचे व्यवहार ज्ञान व्हावे व खर्या कमाईचे महत्वकळावे म्हणून शाळेच्या वतीने विविध उपक्र म राबविले जातात .
या वेळी सरपंच सविता शेळके, उपसरपंच निर्मला शेळके,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गीता शेळके, अशोक शेळके,निवृत्ती शेळके,माधव पानसरे, तुकाराम चव्हाण, मारु ती नेहरे, रमेश शेळके रामा गरु ड,मारु ती शेळके,जनार्दन भवर,संपत शेळके,फकीर शेळके,रामदास नेहरेउत्तम पिंपरकर,बाबासाहेब कोंढरे,आनंदा शेळके,रामदास शेळके,सुनील जाधव अमोल खरे,राम शिरसाठ, अरु ण शेळके,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या बाजारात सुमारे अडीचशे ते तीनशे ग्रामस्थांनी हजेरी लावत चिमुकल्यांकडून भाजीपाला व सामान खरेदी केली .
या वेळी शिक्षिका कल्पना माने,सविता शिरसाठ, उबाळे सर रंजना मडके केंद्रप्रमुख संतोष लोहकरे आदी उपस्थित होते.