अल्लाहका शुकर, हम सब बच गये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:11 AM2021-06-26T04:11:38+5:302021-06-26T04:11:38+5:30

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २९ मार्च २०२० रोजी आढळला होता तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनाने हरसूल येथे २४ जून ...

Thank God we all survived! | अल्लाहका शुकर, हम सब बच गये!

अल्लाहका शुकर, हम सब बच गये!

Next

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २९ मार्च २०२० रोजी आढळला होता तर त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनाने हरसूल येथे २४ जून २०२० रोजी शिरकाव केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी २५ जूनला त्र्यंबकेश्वर शहरातही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. या घटनेला शुक्रवारी (दि.२५) एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात तालुक्यात कोरोनाचे ३१५६ बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी ३०५६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. वर्षभरात कोरोनाने ५६ बळी

घेतले आहेत. यात युवकांसह ज्येष्ठांचाही सहभाग आहे. शहरात आजच्या घडीला १० रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. कोरोनाच्या बाधिताच्या वर्षपूर्तीनिमित्त शहरात आढळलेल्या पहिल्या बाधिताने त्या कटू आठवणींना उजाळा दिला. याबाबत सदर इसमाने सांगितले, सुरुवातीला मी मलेरीया झाला असावा, या समजुतीने दुर्लक्ष केले. नंतर सरकारी दवाखान्यात तपासणी केली असता, पॉझिटिव्ह अहवाल आला. सारे कुटुंब हादरले. माझे हार्डवेअरचे दुकान असल्याने मुले नाशिकला जाऊन माल आणत असत. बहुधा त्यातूनच मला कोरोनाने घेरले असावे. नंतर घरातील एकेक बाधित होत गेले. मी स्वत: त्र्यंबक नगरपरिषदेच्या शिवप्रसाद हॉलमध्ये विलगीकरणात उपचार घेत होतो, सुदैवाने, आम्ही सर्व त्यातून बचावलो. आता कोरोनाने जे उग्र स्वरूप धारण केले ते पाहता अंगावर काटा येतो. अशी वेळ कुणावरही येऊ नये, अशी भावनाही या इसमाने व्यक्त केली.

Web Title: Thank God we all survived!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.