पाणीप्रश्नी भामरे-चव्हाणांमध्ये श्रेयवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:51 PM2018-09-05T23:51:19+5:302018-09-05T23:52:34+5:30

नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका चव्हाण यांच्यात श्रेयवाद सुरू झाला असून, दोघांनीही आपल्या पाठपुराव्यामुळे पाणीप्रश्न सुटल्याचे म्हटले आहे.

Thanksgiving in waterfalls Bhamre-Chavan | पाणीप्रश्नी भामरे-चव्हाणांमध्ये श्रेयवाद

पाणीप्रश्नी भामरे-चव्हाणांमध्ये श्रेयवाद

Next
ठळक मुद्देबागलाण : केळझर, हरणबारीतून ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित

नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका चव्हाण यांच्यात श्रेयवाद सुरू झाला असून, दोघांनीही आपल्या पाठपुराव्यामुळे पाणीप्रश्न सुटल्याचे म्हटले आहे.
जलसंपदा विभागाच्या निर्णयामुळे साल्हेर वळण योजना क्रमांक एकमधून १४.३६ दशलक्ष घनफूट, साल्हेर वळण योजना क्रमांक २ मधून २१.९१ दशलक्ष घनफूट व वाघंबा वळण योजनेतून १६.७५ दशलक्ष घनफूट इतके पाणी बागलाण तालुक्याला मिळणार असून, या हरणबारी धरणातून पाणी मिळावे यासाठी जनतेने आंदोलने केली आहेत. पारनेर, निताणे, आखतवाडे, गोराणे, आनंदपूर, कोटबेल, फोफीर, खिरमाणे, रातीर, सारदे, कºहे, चौगाव, अजमेर, सौंदाणे, देवळाणे, वायगाव, भाक्षी, मुळाणे या गावांना दरवर्षी पाणी प्रश्न भेडसावित असून, त्यासाठी पाठपुरावाही झाला आहे; परंतु दखल घेतली जात नसल्याने बाजार समिती निवडणुकीत ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. संरक्षणमंत्री भामरे यांच्यामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागल्याचा तर आमदार चव्हाण यांनी प्रधान सचिवांसोबत बैठक घेतल्यामुळे पाणी प्रश्न सुटल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. दोन्ही बाजूंनी कामाचे श्रेय घेताना आजवरच्या पत्राचा संदर्भ देत पुरावे जाहीर केले आहेत. तत्कालीन आघाडी सरकारने बागलाणसाठी योजना व्यवहार्य नसल्याचे सांगून फेटाळली होती; आमदार दीपिका चव्हाण व संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी आपापल्या पातळीवर या संदर्भात पाठपुरावा सुरू ठेवला होता. तरीही विलंब होत असल्याचे पाहून अलीकडेच वीरगाव येथे शेतकऱ्यांनी आंदोलनही छेडले होते.जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा, हरणबारी, केळझर चारी क्रमांक ८ व सटाणा शहरासाठी पाणी योजना मंजूर करण्याचा निर्णय घेतला. आता जलसंपदा खात्याने हरणबारी व केळझरमधील पाणी बागलाणसाठी राखीव ठेवण्यास अनुमती दिल्याने त्यातून श्रेयवाद सुरू झाला.

Web Title: Thanksgiving in waterfalls Bhamre-Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण