दहा रुपयांचे वाढीव तिकीट दिल्याने बस वाहकास मारहाण, मुलाने चौकात गाठले
By नामदेव भोर | Published: September 2, 2022 04:46 PM2022-09-02T16:46:34+5:302022-09-02T16:47:42+5:30
या प्रकरणी वैभव थोरात यांनी मुंबईनाका पोलीस ठाणयात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक गेंगजे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
नाशिक : सोलापूर ते नाशिक अशी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या करमाळा आगातील बस वाहकास द्वारका परिसरात टोळक्याकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ३१ ऑगस्ट २०२२ रात्री आठवाजेच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी वैभव थोरात यांनी मुंबईनाका पोलीस ठाणयात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक गेंगजे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करमाळा आगाातील बस क्रमांक एमएच १४ बी. टी. २८२५ चे वाहक वैभव ब्रम्हदेव खरात ( ३४, रा. करमाळा) चालक महादेव भिमराव शेंबरे यांच्यासोबत सोलापूरहून नाशिक अशी प्रवाशी करीत असताना दोन महिला प्रवाशी शिर्डी ते नाशिक प्रवासासाठी बसमध्ये बसल्या. त्यांनी नाशिकरोड बस स्थानकाचे तिकीट घेतले त्यापैकी एक महिला नाशिकरोड व लहान मुलगा नाशिरोड बसस्थानक येथे उतरले. मात्र एक महिला नाशिकरोडला न उतरता बस मधून प्रवास करीत असल्याचे वाहक खरात यांच्या लक्षात आले. त्यांनी महिलेला १० रुपयांचे तिकीट दिले. त्यामुळे महिलेने वाहक खरात यांच्यासोबत वावाद करून त्यांच्या मुलाला फोन करून द्वारका सर्कल येथे बोलावून घेतले. द्वारका सर्कल येथे महिलेच्या मुलाने बसमध्ये चढून वाहकाला मारहाण केली. तसेच बसच्या खाली ओढून त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी खरात यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली. .