आज प्रचार सभा धडाडणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगाव मध्ये तर उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा
By संजय पाठक | Updated: May 15, 2024 10:26 IST2024-05-15T10:26:15+5:302024-05-15T10:26:37+5:30
शरद पवार मोर्चे बांधणी करणार

आज प्रचार सभा धडाडणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगाव मध्ये तर उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नाशिक आणि दिंडोरीच्या लोकसभा मतदार संघासाठी २० मेस मतदान होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पिंपळगाव बसवंत येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव परिसर हा कांद्याचा पट्टा भाऊ ओळखला जातो कांदा निर्यात बंदीमुळे या भागामध्ये मुळातच शेतकऱ्यांचा रोष असताना मोदी यांची सभा आज दुपारी एक वाजता होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक मध्ये असतानाच उद्धव ठाकरे यांचीही सभा नाशिक मध्ये होणार आहे सायंकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ही सभा होणार आहे त्यांच्या समवेत खासदार संजय राऊत हे देखील असणार आहेत. दरम्यान, शरद पवार आज नाशिकमध्ये येणार असून दुपारी अडीच ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ते हॉटेल एमराल्ड पार्क येथे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत त्यानंतर रात्री आठ वाजता दिंडोरी तालुक्यातील वणी इथे त्यांची सभा होणार आहे.