केंद्र सरकारने काढले नाफेडचे कांदा दरनिश्चितीचे अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 07:35 AM2024-06-15T07:35:13+5:302024-06-15T07:39:01+5:30

Onion Prices News: उन्हाळ कांद्याचे दर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने नाफेड व एनसीसीएफ या दोन संस्थांमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र कांद्याच्या दर निश्चितीचे नाफेडला असलेले अधिकारच सरकारने काढला.

The central government has withdrawn NAFED's authority to fix onion prices | केंद्र सरकारने काढले नाफेडचे कांदा दरनिश्चितीचे अधिकार

केंद्र सरकारने काढले नाफेडचे कांदा दरनिश्चितीचे अधिकार

नाशिक - उन्हाळ कांद्याचे दर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने नाफेड व एनसीसीएफ या दोन संस्थांमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र कांद्याच्या दर निश्चितीचे नाफेडला असलेले अधिकारच सरकारने काढला. गेल्या काही दिवसांपासून नाफेडकडे बाजारपेठेपेक्षा भाव कमी असल्याने या खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. बाजारभावापेक्षा किमान पाचशे रुपये अधिक मिळतील, अशा दराने नाफेडमार्फत पूर्वी कांदा खरेदी केली जात होती. परंतु, आता वाणिज्य मंत्रालयामार्फत प्रत्येक आठवड्याला एक दर निश्चित केला जाणार आहे. त्याप्रमाणेच आता नाफेड व एनसीसीएफला खरेदी करणे बंधनकारक राहणार आहे.

Web Title: The central government has withdrawn NAFED's authority to fix onion prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.