सिक्युरिटी प्रेसमध्ये तयार होणार ई-पासपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 01:11 AM2022-02-02T01:11:53+5:302022-02-02T01:12:24+5:30
पासपाेर्टची सुरक्षा आणि त्याचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये अत्याधुनिक चिपच्या साह्याने ई-पासपोर्ट तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. त्यास केंद्रीय अर्थसंल्पातही मंजुरी मिळाली असल्याने नाशिककरांसाठी हा बहुमान असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.
नाशिक : पासपाेर्टची सुरक्षा आणि त्याचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये अत्याधुनिक चिपच्या साह्याने ई-पासपोर्ट तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला होता. त्यास केंद्रीय अर्थसंल्पातही मंजुरी मिळाली असल्याने नाशिककरांसाठी हा बहुमान असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.
भारतात ई-पासपोर्ट प्रणाली सुरू करण्याबाबतचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आल्यानंतर अशाप्रकारच्या पासपोर्टची छपाई नाशिकमध्ये व्हावी यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केल्याचा दावा गोडसे यांनी केला आहे. याविषयी त्यांनी सांगितले की, केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक रोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ई-पासपोर्ट तयार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे प्रेसमधील कामगारांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. सिक्युरिटी प्रेसमध्ये पासपोर्ट तयार करण्याबाबत गेल्या काही वर्षांपासून आपण पाठपुरावा करीत होतो त्यास यश आल्याचे गोडसे यांनी सांगितले.
--इन्फो--
भारत सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला तेंव्हा नोटा छपाईचे कामही करन्सी नोट प्रेसलाच देण्यात आले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून निर्धारित मागणीनुसार नोटांची छपाई करून दिली होती. या कामासाठी कर्मचाऱ्यांना विशेष इन्सेंटिव्ह देखील देण्यात आला होता. नोटाबंदीनंतर नवीन चलन म्हणून दोन हजारांची नोट प्रथमच चलनात येणार असल्याने देशवासीयांना या नोटेची उत्सुकता होती.
--इन्फो--
असा असेल ई-पासपोर्ट
सुरक्षिततेच्या दृष्टीने ई-पासपोर्ट महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये अधिक सुरक्षिततेची काळजी घेण्यात आलेली असेल, डिजिटल स्वाक्षरीसह पासपोर्टमधील माहिती लिक होऊ शकणार नाही, अशी चिप यामध्ये बसविली जाणार आहे. संपूर्ण माहिती सुरक्षित राहील अशी व्यवस्था या पासपेार्टमध्ये असेल. या पासपोर्टमध्ये कुणी काही छेडखानी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची माहिती सिस्टिमला लागलीच कळणार आहे.