वाढदिवस ठरला युवतीचा मृत्यू दिवस! भरधाव कार उलटली; सहा विद्यार्थी गंभीर जखमी

By अझहर शेख | Published: August 5, 2022 01:12 PM2022-08-05T13:12:50+5:302022-08-05T13:14:16+5:30

Accident Case : पंचवटीतील हिरे महाविद्यालयात शिकणारे महाविद्यालयीत मित्र-मैत्रिणींचा ग्रूप कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून बुधवारी बाहेर पडले.

The girl's birthday was the death day! The speeding car overturned; Six students were seriously injured | वाढदिवस ठरला युवतीचा मृत्यू दिवस! भरधाव कार उलटली; सहा विद्यार्थी गंभीर जखमी

वाढदिवस ठरला युवतीचा मृत्यू दिवस! भरधाव कार उलटली; सहा विद्यार्थी गंभीर जखमी

Next

अझहर शेख

नाशिक : वाढदिवस साजरा करण्यासाठी सात मित्र-मैत्रिण काश्यपी धरणाकडे बुधवारी (दि.३) गेले होते. तेथे सर्वांनी मिळून कोमल ओमप्रकाश सिंग (१८,रा.पाइपलाइन रोड,आनंदवली) हिचा वाढदिवसाचा केक कापला. फोटोसेशन केले आणि आनंदात पुन्हा नाशिकच्या दिशेने परतीचा प्रवास इरटिगा कारमधून सुरु केला. महादेवपूर शिवारात कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या एका भुखंडाच्या संरक्षक भींतीवर आदळून उलटली. या अपघातात कोमलचा मृत्यू झाला तर तिचे सहा मित्र-मैत्रिण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

पंचवटीतील हिरे महाविद्यालयात शिकणारे महाविद्यालयीत मित्र-मैत्रिणींचा ग्रूप कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून बुधवारी बाहेर पडले. दरम्यान, कोमलचा वाढदिवस असल्याने सर्वांनी काश्यपी धरण परिसरात तिचा वाढदिवस साजरा करण्याचा बेत आखला. तन्वीर निसार मन्सुरी (२२,रा.पखालरोड) याने इरटिगा कार (एम.एच१५ ई.एक्स ०९४९) चालवून काश्यपी धरणावर नेली. सर्वांनी तेथे आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा केला. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास हे सर्व विद्यार्थी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले.

नाशिककडे गिरणारे-दुगावमार्गे येत असताना गंगापुर धरणाच्यापुढे महादेवपूर शिवारात कारचालक तन्वीर याचा ताबा सुटला. यामुळे भरधाव कार रस्त्यालगतच्या एका संरक्षक भींतीवर जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरक्ष: चक्काचुर झाला. कारमधून युवक, युवती बाहेर फेकले गेले. अपघाताची माहिती तालुका पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस निरिक्षक सारिका आहिरराव, अनिल मुरडनर, नीलेश गांगुर्डे, जावेद पठाण, दिपक पाटील यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. तातडीने १०८ आपत्कालीन वैद्यकिय सेवा देणाऱ्या दोन रुग्णवाहिकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकांमधून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. रात्री उशीरा उपचारादरम्यान कोमलची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कांतीलाल व्यापारे हे करीत आहेत.

हे गंभीर जखमी

हेमंत कमलाकर गायकर (२०), वैष्णवी मंडलकर (३०), तन्वीर मन्सुरी (२२),नेहा सोनी (१८), आतीष छिडे (२०), विलास हातांगळे (२०) हे सर्व गंभीररित्या जखमी झले आहेत. यांच्या डोक्याला, हातापायांना दुखापत झाली आहे. सुरवातीला सर्वांवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार करण्यात आले. यानंतर गुरुवारी त्यांच्या पालकांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलविल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The girl's birthday was the death day! The speeding car overturned; Six students were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.