पिंपळगावची ग्रामपंचायत ठरली आयएसओची मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 11:05 PM2022-02-05T23:05:24+5:302022-02-05T23:06:24+5:30

पिंपळगाव बसवंत : स्वच्छ आणि सुंदर गाव, पुस्तकांचे गाव, मागील वर्षी माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या पिंपळगाव बसवंतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून राज्यात प्रथम आयएसओ मानांकन ग्रामपंचायत म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतला बहुमान मिळाला आहे. त्यात पाच लाखांचे बक्षीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते देण्यात आले.

The Gram Panchayat of Pimpalgaon became the standard bearer of ISO | पिंपळगावची ग्रामपंचायत ठरली आयएसओची मानकरी

पिंपळगाव बसवंत येथील ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड. समवेत ग्रामपंचायतीचे व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी.

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील पहिलीच ग्रामपंचायत : गावाच्या शिरपेचात आणखी एक तुरा

पिंपळगाव बसवंत : स्वच्छ आणि सुंदर गाव, पुस्तकांचे गाव, मागील वर्षी माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या पिंपळगाव बसवंतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून राज्यात प्रथम आयएसओ मानांकन ग्रामपंचायत म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतला बहुमान मिळाला आहे. त्यात पाच लाखांचे बक्षीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते देण्यात आले.

पिंपळगावी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डेदेखील आहेत. वनराई बंधारे, विविध दाखल्यांसाठी ऑनलाइन सेवा-सुविधा, यासह शाळा डिजिटलदेखील झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याने संपूर्ण गावात लक्ष ठेवले जाते. पंचायतीची पाणपट्टी आणि घरपट्टीची वसुलीही शंभर टक्के आहे. सर्व शासकीय कार्यालयात स्वच्छतागृह आणि शंभर टक्के शौचालयांचा वापर केला जातो. गाव स्मार्ट करण्यासाठी सरपंच अलका बनकर, उपसरपंच नीलेश बापू कडाळे, ग्रामसेवक लिंगराज जंगम, ग्रामपंचातीचे सदस्य गणेश बनकर तसेच ग्रामस्थ यांचे योगदान आहे. माझी वसुंधरा अभियनांतर्गत ग्रामपंचायतीला यापूर्वी तब्ब्ल दीड कोटींचे पारितोषिक मिळाले होते. याशिवाय स्मार्ट ग्राम या योजनेत सहभागी होऊन पुन्हा राज्यात एक नंबरचा क्रमांक मिळवला होता. आता ग्रामपंचायतीला आएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.
सदर प्रमाणपत्राचे वितरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांना दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चाटे, प्रकल्प संचालक, उज्ज्वला बावके, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहायक गटविकास अधिकारी रविकांत सानप, विस्तार अधिकारी शिंदे, सोनवणे, आदी उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांचा सत्कार
पिंपळगाव ग्रामपालिकेने राज्यात प्रथम आयएसओ मानांकित होण्याचा बहुमान पटकविल्याने निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते उपसरपंच बापू कडाळे, सदस्य गणेश बनकर, संजय मोरे, सुहास मोरे, सुरेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक विधाते, राहुल बनकर, आश्विन घागरे, रामकृष्ण खोडे, बाळा बनकर, गोरख देवकर आदी उपस्थित होते.
 

Web Title: The Gram Panchayat of Pimpalgaon became the standard bearer of ISO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.