महामारी काळात संवादाचे महत्त्व अधोरेखित : श्रीधर साळुंके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 01:21 AM2022-05-21T01:21:07+5:302022-05-21T01:21:07+5:30
संवाद का गरजेचा असतो, याचे महत्त्व दोन वर्षांतील महामारी काळात पुन्हा एकदा अधोरेखित झाले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आजपर्यंत सर्वश्रेष्ठ मानला जातो. श्रीकृष्ण तत्त्व समजून घेणे म्हणजे संवाद साधणे होय. इतरांसोबतच व्यक्तीचा स्वत:च्या मनाशी संवाद होणे गरजेचे असते, असे मत श्रीधर साळुंके यांनी मांडले. गोदाकाठावरील य. म. पटांगणावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. २०) ते बोलत होते. स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यानात ‘मानवी जीवनात संवादाचे महत्त्व’ विषयावर त्यांना पुष्प गुंफले.
नाशिक : संवाद का गरजेचा असतो, याचे महत्त्व दोन वर्षांतील महामारी काळात पुन्हा एकदा अधोरेखित झाले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आजपर्यंत सर्वश्रेष्ठ मानला जातो. श्रीकृष्ण तत्त्व समजून घेणे म्हणजे संवाद साधणे होय. इतरांसोबतच व्यक्तीचा स्वत:च्या मनाशी संवाद होणे गरजेचे असते, असे मत श्रीधर साळुंके यांनी मांडले. गोदाकाठावरील य. म. पटांगणावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. २०) ते बोलत होते. स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यानात ‘मानवी जीवनात संवादाचे महत्त्व’ विषयावर त्यांना पुष्प गुंफले.
ते म्हणाले, व्यक्तीचा संवाद आजूबाजूच्या व्यक्तींबरोबरच आपल्या मनाशी होणे अपेक्षित असते. ज्या ठिकाणी मने जुळतात तेथे संवादाशिवाय नाते घट्ट होते. मनमोकळेपणाने बोलण्याचे ठिकाण म्हणजे मित्र असतो. मात्र, तो मित्रदेखील जिवाभावाचा असावा लागतो. चुकीच्या मार्गावर नेणारा नसावा. अन्यथा जीवनात मोठे नुकसान होते. आपला संवाद अनेक नात्यांमध्ये असतो. यात पालक व पाल्य यांच्यातील संवाद कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अश्रू जीवनग्रंथाचा पूर्णविराम आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या काळात पालकांनी जागृत असणे गरजेचे आहे. संवाद मनाचा मनाशी होणे गरजेचे आहे. म्हणजे आवाज वाढविण्याची गरज नसते, मने जुळतात तेथे शब्दांशिवाय सर्व काही समजते, असे साळुंके यांनी सांगितले.