लेखनाचा प्रवास वास्तव, इतिहासाला धरून असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 12:32 AM2022-04-16T00:32:20+5:302022-04-16T00:32:20+5:30

नाशिक : मराठी वाचक खूप जागरूक आहे. लेखकाकडून झालेली एखादी चूक त्याच्या चटकन लक्षात येते. त्यामुळे ऐतिहासिक लेखन करताना लेखकाला वास्तव आणि इतिहास यातून प्रवास करावा लागतो. डोंबाऱ्याच्या खेळातील दोरीवरून कलाकार खाली पडू नये, आणि खेळही रंगात यावा, अशी ही कसरत असते, असे प्रतिपादन पानिपतकार विश्वास पाटील यांनी केले.

The journey of writing must be based on reality, history | लेखनाचा प्रवास वास्तव, इतिहासाला धरून असावा

लेखनाचा प्रवास वास्तव, इतिहासाला धरून असावा

Next

नाशिक : मराठी वाचक खूप जागरूक आहे. लेखकाकडून झालेली एखादी चूक त्याच्या चटकन लक्षात येते. त्यामुळे ऐतिहासिक लेखन करताना लेखकाला वास्तव आणि इतिहास यातून प्रवास करावा लागतो. डोंबाऱ्याच्या खेळातील दोरीवरून कलाकार खाली पडू नये, आणि खेळही रंगात यावा, अशी ही कसरत असते, असे प्रतिपादन पानिपतकार विश्वास पाटील यांनी केले.
भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त श्री जैनसेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. १५) परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ते बोलत होते. ह्यमी आणि माझे लेखनह्ण विषयावर त्यांनी दुसरे पुष्प गुंफले. बेबीलाल संचेती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रा. यशवंत पाटील, मोहनलाल ब्रह्मेचा, राजेंद्र कुमट, सोनल दगडी, संगीता बाफना आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ह्यपानिपतह्ण माझ्यासाठी ह्यपुण्यपतह्ण ठरले. या कादंबरीला वाचकांनी डोक्यावर घेतले, अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. तसेच या कादंबरीमुळे ७० पुरस्कार आणि मानसन्मान मिळवून दिला. लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना पुस्तके वाचून घडलो. इयत्ता पाचवीत असताना भगवान महावीर, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा गांधी, साने गुरुजी वाचले. शिक्षकांचेही योग्य मार्गदर्शन लाभल्याने वाचनासोबतच लेखनाची आवड निर्माण झाली.
इतिहास लेखनात सणावळ्या, तह असतातच, मात्र लेखकाने त्यातून माणुसकीचा झरा शोधायचा असतो. लेखक हा समाज, प्रदेश, भाषेला बांधील नसतो; तो माणुसकीचा कैवारी असायला हवा.
ऐतिहासिक लेखक अनेकदा मनाचे किती आणि इतिहासाचे किती लिहिले जाते, अशी विचारणा करतात. त्यामुळे लेखकाला वास्तव आणि इतिहास यातून प्रवास करावा लागतो. पुराव्याच्या आधारे लेखन करावे लागते, असे पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम सुराणा यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी कटारिया यांनी केले.

Web Title: The journey of writing must be based on reality, history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक