नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्याचा डावा कालवा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 11:22 PM2022-02-07T23:22:32+5:302022-02-07T23:23:06+5:30
निफाड : रब्बी हंगामासाठी शनिवारी (दि.५) नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या डाव्या कालव्याला ३०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले होते. नांदूरमध्यमेश्वर शिवारात इकडे ...
ठळक मुद्देनिफाड रब्बी हंगामासाठी हजारो क्यूसेस पाणी वाया
निफाड : रब्बी हंगामासाठी शनिवारी (दि.५) नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या डाव्या कालव्याला ३०० क्यूसेस पाणी सोडण्यात आले होते. नांदूरमध्यमेश्वर शिवारात इकडे वस्तीच्यापुढे म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या या कालव्याच्या मोरीचा स्लॅब कोसळल्याने हजारो क्यूसेस पाणी वाया गेले आहे.
या कालव्यावरील मोऱ्या, स्लॅब जीर्ण झाले आहेत, त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर शिवारात म्हसोबा मंदिराजवळील मोरीचा स्लॅब रविवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास कोसळल्याने या कालव्यातील पाणी ओहोळातून वाहत गेले व हजारो क्यूसेस पाणी वाया गेले असून सोमवारी (दि.७) या फुटलेल्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.