विहिरीतून हुलकावली देणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला?; विहिरीतून पळालेला बिबट्या दुसरा असल्याचीही चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 03:54 PM2022-05-27T15:54:22+5:302022-05-27T15:54:34+5:30
गेल्या आठ दिवसांपूर्वी फुलेनगर(माळवाडी) शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती.
सिन्नर (नाशिक)- तालुक्यातील फुलेनगर(माळवाडी) शिवारात चिक्कूच्या बागेत लावलेल्या पिंजºयात बिबट्या अलगद अडकला गेला. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यास रेस्क्यू करण्यासाठी वनवनविभागाचे प्रयत्न सुरु होते. अखेर शुक्रवारी बिबट्या पिंजºयात अडकल्याने शेतकºयांसह वनविभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
गेल्या आठ दिवसांपूर्वी फुलेनगर(माळवाडी) शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. त्यावेळी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचण्याच्या आत बिबट्याने विहिरीतून चढाई करुन पळ काढला होता. त्यानंतर बिबट्याने वसंत पठाडे यांच्या गोठ्यातील वासरावर हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. शुक्रवारी पहाटे पठाडे यांच्या शेतातील पिंजºयात बिबट्या अडकला.
मंगळवारी पहाटे फुलेनगर(माळवाडी) शिवारात वसंत रभाजी पठाडे यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करुन त्यास जखमी केले होते. त्यानंतर या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात बिबट्या दिसून येत होते. शुक्रवारी पहाटे पिंजºयात बिबट्या अडकला. घटनेची माहिती सिन्नरच्या वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाने बिबट्या घटनास्थळीवरुन ताब्यात घेतला.
विहिरीतून पळालेला बिबट्या पिंजºयात?
गेल्या आठवड्यात फुलेनगर शिवारातील दत्तात्रय आनप व सुरेश माळी यांच्या विहिरीत बिबट्या पडला होता. तथापि, बिबट्याने विहिरीतून स्वत: चढाई करुन ऊसात धूम ठोकली होती. त्यानंतर सदर बिबट्या अनेक ठिकाणी दिसला होता. अखेर शुक्रवारी पहाटे बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला. त्यामुळे पिंजºयात जेरबंद झालेला बिबट्या विहिरीत पडलेला बिबट्याचा असण्याची अंदाज आहे. तथापि, काही शेतकºयांनी विहिरीत पडलेल्या बिबट्या व आता पिंजºयात जेरबंद असलेला बिबट्या वेगवेगळे असल्याचे म्हटले आहे. सदर दोन्ही बिबटे वेगवेगळे असल्याचा अंदाजही शेतकºयांनी व्यक्त केला.
आगीतून विहिरीत आणि नंतर पिंजºयात..
ऊस पेटल्यानंतर पळालेला बिबट्या विहिरीत पडल्याचे सांगितले जाते. वनविभागाचे कर्मचारी येण्याच्या आत बिबट्याने स्वत: ६० फूट खोल विहिरीतून चढाई करुन धूम ठोकली. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर होता. त्यानंतर विभागाने चिक्कूच्या बागेत लावलेल्या पिंजºयात बिबट्या अडकला गेला. त्यामुळे हाच तो बिबट्या असल्याचे काहींचे म्हणणे आहे तर काहींच्या मते अजून एक बिबट्या या परिसरात वावरत आहे.