नाशकात डेंग्यूची रुग्णसंख्या १०४ पार, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण

By Suyog.joshi | Published: May 31, 2024 03:40 PM2024-05-31T15:40:57+5:302024-05-31T15:43:07+5:30

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरात डेंग्यूने डोके वर काढल्याने नागरिक चिंतीत झाले आहे.

The number of dengue patients in Nashik is 104 there is an atmosphere of concern among the citizens | नाशकात डेंग्यूची रुग्णसंख्या १०४ पार, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण

नाशकात डेंग्यूची रुग्णसंख्या १०४ पार, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण

नाशिक : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरात डेंग्यूने डोके वर काढल्याने नागरिक चिंतीत झाले आहे. जानेवारी ते मे महिन्यात रुग्णसंख्या १०४ वर गेली असून मे महिन्यात ३३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  मे महिन्यातच रुग्णांची संख्या तब्बल ३३ वर गेली आहे. त्यामुळे शहर डेंग्यूचा हॉटस्पॉट झाला आहे. यामुळे आरोग्य विभाग देखील सतर्क झाला असून उपाययोजना करण्यात येत आहे.

दरम्यान पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे दिसते. मात्र पावसाळ्यापूर्वीच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या शंभरी पार गेल्याने पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिघण्याची शक्यता आहे. शहरात धूर फवारणी नावालाच असून प्रत्यक्षात ती होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे. तसेच जेथे फवारणी होते. तेथे केवळ धूराचीच फवारणी होते, डासांना प्रतिबंध घातला जाईल ती, औषधी धूर फवारणीमध्ये नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो आहे.  लक्षणे आढळल्यास नागरिकांनी रुग्णालयात जाऊन त्वरित तपासणी करुन घ्या असे आवाहन नागरिकांना केले आहे.  

शहरातील प्रभागाच्या व्याप्तीनुसार धूर फवारणी केली जाते. शहरात जानेवारी ते मे महिन्यापर्यत १०४ वर रुग्ण संख्या गेली असून आरोग्य विभाग यावर लक्ष ठेऊन आहे. नागरिकांनी घाबरून न जाता डॉक्टरांनी संपर्क करावा.
-डॉ.नितीन रावते,
जीवशास्त्रज्ञ मलेरिया विभाग, मनपा

Web Title: The number of dengue patients in Nashik is 104 there is an atmosphere of concern among the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक