बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 01:24 AM2022-01-29T01:24:06+5:302022-01-29T01:24:33+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २८) २ हजार ६५६ कोरोनाबाधित आढळून आले तर २ हजार ९०० रुग्णांनी कोरोनावर मात केली. बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याने काहीसा दिलासा मिळाला. दिवसभरात ५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात शहरातील २, ग्रामीण भागातील २ व मालेगावमधील एकाचा समावेश आहे.
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २८) २ हजार ६५६ कोरोनाबाधित आढळून आले तर २ हजार ९०० रुग्णांनी कोरोनावर मात केली. बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याने काहीसा दिलासा मिळाला. दिवसभरात ५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात शहरातील २, ग्रामीण भागातील २ व मालेगावमधील एकाचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने तीन हजारांच्या जवळपास आढळून येत आहे. शुक्रवारी बाधितांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने शुक्रवारचे दिलासादायक चित्र असले तरी अनेक दिवसांनंतर मृत्यूची संख्या पाचवर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा ८ हजार ७९७ वर पोहचला आहे.
दिवसभरात नाशिक शहरात १ हजार ७८६ , ग्रामीण भागात ७८९, मालेगावी ६ तर जिल्हाबाह्य ७५ रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत २ हजार २९६ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्हाभरात १७ हजार ७२ रुग्ण उपचार घेत असून त्यात १५ हजार ४२४ रुग्ण लक्षणेविरहित आहेत. १ हजार ६४८ रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली असून १२७ रुग्ण ऑक्सिजनवर तर २८ रुग्ण व्हेंटीलेटवर आहेत.
--------
२५ नोव्हेंबरनंतर सर्वाधिक मृत्यू
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णवाढ तीन हजारांवर पोहचली असली तर मृतांचा आकडाशून्य, एक किंवा दोन असा नोंदवला जात आहे. मात्र, शुक्रवारी मृतांचा आकडा पहिल्यांदाच ५ वर पोहचला. २५ नोव्हेंबर २०२२ नंतरची मोठी संख्या आहे. २५ नोव्हेंबरला नाशिक शहरात १ तर ग्रामीण भागात ४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २६ नोव्हेंबरला तीन, १६ डिसेंबरला ३ व २२ जानेवारी २०२२ रोजी तीन रुग्णांचा बळी गेला होता.