सिमेंट मिक्सर चौदाचाकी ट्रकने वृद्धाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 01:35 AM2022-05-13T01:35:07+5:302022-05-13T01:35:33+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या आडगाव ट्रक टर्मिनन्सजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या चौदाचाकी सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी (दि. १२) दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी ट्रक सोडून चालकाने पोबारा केला. सुदाम बळवंत दिघे (वय ६८, रा. पिंपळगाव बसवंत) असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.
पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या आडगाव ट्रक टर्मिनन्सजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या चौदाचाकी सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी (दि. १२) दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी ट्रक सोडून चालकाने पोबारा केला. सुदाम बळवंत दिघे (वय ६८, रा. पिंपळगाव बसवंत) असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.
पिंपळगाव येथिल रहिवासी असलेले दिघे व दत्तात्रय पिंपळनेरकर हे दोघे त्यांच्या ताब्यातील दुचाकीने ओझरकडून द्वारकेच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी दुपारच्या सुमारास आडगाव ट्रक टर्मिनन्सजवळ महामार्गावरून वळण घेताना ओझरकडून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे रस्त्यावर कोसळून रक्तबंबाळ झाले. डोक्याला जबर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, वाहतूक पोलीस निरीक्षक सुभाष पवार, आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले; मात्र दिघे यांचा मृत्यू झाला, तर पिंपळनेरकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत रात्री आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.