घरात शिरून महिलेचे दागिने लुटणाऱ्यास बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 12:59 AM2022-02-10T00:59:24+5:302022-02-10T01:00:25+5:30

पखाल रोडवरील एका शिक्षकाच्या घरात शिरून महिलेच्या डोक्यावर मारहाण करीत, अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे.

The one who broke into the house and robbed the woman of her jewelery | घरात शिरून महिलेचे दागिने लुटणाऱ्यास बेड्या

घरात शिरून महिलेचे दागिने लुटणाऱ्यास बेड्या

Next
ठळक मुद्देदोन दिवसांत गुन्हा उघड : लोखंडी सळ्याने केला होता हल्ला

नाशिक : पखाल रोडवरील एका शिक्षकाच्या घरात शिरून महिलेच्या डोक्यावर मारहाण करीत, अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे.

पखाल रोडवरील अनसार व्हिला येथील रहिवासी शमशाद अनसारोद्दीन काझी (५५) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने लोखंडी रॉडने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर, चोरट्याने शमशाद यांच्या अंगावरील ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घरात शिरून मारहाण करीत लुटमार केल्याने, या गुन्ह्याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. मात्र, एकही संशयास्पद व्यक्ती शमशाद यांच्या घरात शिरताना किंवा बाहेर पडताना दिसत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी बंगल्यात कॉट बेसिसवर भाडेतत्त्वावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाकडे चौकशी केली. सुरुवातीस त्याने उत्तरे देण्यास टाळाटाळ केली. मात्र, पोलीस तपासात हा गुन्हा त्यानेच केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून काजी यांच्या अंगावरील दागिने हस्तगत केले आहेत. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी तपासचक्रे वेगाने फिरवून संशयितास ताब्यात घेतले.

Web Title: The one who broke into the house and robbed the woman of her jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.