हुक्का पार्टीत देशभरातील व्यापारी-उद्योजकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 10:46 PM2022-03-14T22:46:05+5:302022-03-14T22:46:27+5:30

गणेश घाटकर, लोकमत न्यूज नेटवर्क इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडीत माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये ग्रामीण पोलिसांनी हुक्का पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर त्यातील अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. रेवती हार्ड वेअर स्पेअर पार्ट कंपनीला चांगला नफा झाल्याने शनिवार व रविवारी दोन दिवस देशभरातील काही व्यापारी व उद्योजकांना या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यात काही आंबट शौकिनांनी मुंबईहून देहविक्रीसाठी महिलांना बोलावून घेतल्याचेही उघड झाले आहे. पोलिसांनी मात्र ही पार्टी उधळून लावल्याने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले.

The participation of traders and entrepreneurs from all over the country in the hookah party | हुक्का पार्टीत देशभरातील व्यापारी-उद्योजकांचा सहभाग

हुक्का पार्टीत देशभरातील व्यापारी-उद्योजकांचा सहभाग

Next
ठळक मुद्देकंपनीला नफा झाल्याने ठेवली होती पार्टी : आंबटशौकिनांनी केला घात

गणेश घाटकर,
लोकमत न्यूज नेटवर्क
इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडीत माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये ग्रामीण पोलिसांनी हुक्का पार्टीवर टाकलेल्या छाप्यानंतर त्यातील अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत. रेवती हार्ड वेअर स्पेअर पार्ट कंपनीला चांगला नफा झाल्याने शनिवार व रविवारी दोन दिवस देशभरातील काही व्यापारी व उद्योजकांना या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यात काही आंबट शौकिनांनी मुंबईहून देहविक्रीसाठी महिलांना बोलावून घेतल्याचेही उघड झाले आहे. पोलिसांनी मात्र ही पार्टी उधळून लावल्याने त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले.

मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रातून व देशाच्या विविध भागातून इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक वीकेंड साजरा करण्यासाठी येत असतात. निसर्गाचे लाभलेले वरदान आणि सोयीसुविधांनी सज्ज असलेले रिसॉर्ट व हॉॅटेल्स यामुळे याठिकाणी पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. त्यातच धनिकांकडून याठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. काही पार्ट्यांमध्ये खुलेआम अमली पदार्थांचा वापर होत असल्याने इगतपुरी तालुका त्यामुळे बदनाम झाला आहे. त्याचा परिणाम पर्यटकांवर होत आहे. शनिवारी मध्यरात्री इगतपुरी येथील त्रिंगलवाडीमधील पारदेवी शिवारात माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये एका बड्या उद्योजकाने त्याच्या रेवती हार्डवेअर स्पेअर पार्ट कंपनीला चांगला नफा झाल्याने सलग शनिवार व रविवार असे दोन दिवस पार्टीसाठी त्याच्या डिस्ट्युब्यूटर्ससह काही व्यापाऱ्यांना निमंत्रित केले होते. परंतु, त्यातील काही आंबटशौकिनांनी देह विक्री करणाऱ्या महिलांना बोलावून घेतल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी ५२ लोकांना ताब्यात घेतले त्यात अनेक उद्योजक-व्यापारी असल्याचे समजते. दुसऱ्या दिवशीही काही उद्योजक या पार्टीत सामील होणार होते. परंतु त्याआधीच पोलिसांनी छापा टाकत पार्टी उधळून लावली.

खुशीऐवजी, बदनामी नशिबी आली
कंपनीला चांगला नफा झाल्याने कंपनी मालकाने या पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी माऊंटन शॅडो रिसॉर्ट दोन दिवसांसाठी आरक्षित करण्यात आले होते. या पार्टीमध्ये देशभरातील कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ या प्रांतातील व्यापारीही सहभागी झाले होते. आपल्या व्यापाऱ्यांना खूष ठेवण्यासाठी ही पार्टी ठरवली गेली, परंतु पोलीसांच्या कारवाईने पार्टी उधळली जाऊन व्यापारी मंडळीच्या नशिबी बदनामी आली.

Web Title: The participation of traders and entrepreneurs from all over the country in the hookah party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.