ठाकरे गटाच्या विरोधामुळे चुकले नाशिकचे फेरनियोजन; गंगापूर धरणसाठ्यात घट

By संजय पाठक | Published: June 16, 2023 06:50 PM2023-06-16T18:50:29+5:302023-06-16T18:54:13+5:30

नाशिककरांच्या तोंडचे पळाले पाणी

The re-planning of Nashik failed due to the opposition of the Thackeray group | ठाकरे गटाच्या विरोधामुळे चुकले नाशिकचे फेरनियोजन; गंगापूर धरणसाठ्यात घट

ठाकरे गटाच्या विरोधामुळे चुकले नाशिकचे फेरनियोजन; गंगापूर धरणसाठ्यात घट

googlenewsNext

नाशिक- मृग नक्षत्र लागून पंधरा दिवस उलटले आणि नाशिक शहरात
मृगाच्या सरीही बरसल्या नाही. त्यामुळे नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळाले
आहे. शासनाने अगोदरच फेरनियोजन करण्याचा आदेश देऊन देखील तत्कालीन नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पाणी कपातीचा प्रस्ताव पुढे केला नाही. त्यामागे ठाकरे गटाचा विरोध असल्याचा आरोप शिंदे गट आणि भाजपाने केला आहे.

जून महिन्याचा पंधरवाडा गेला तरी नाशिकमध्ये पाऊस झालेला नाही. यापूर्वी
वेध शाळेने अलनिनो मुुळे पाऊस लांबणीवर पडणार असे जाहिर केले आहे
त्यामुळे सध्या नाशिककरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे त्यातच नाशिकमध्ये
पाण्याचे फेरनियाेजन करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पालकमंत्री दादा
भुसे यांनी बैठका घेतल्या आणि महापालिकेस देखील आदेश दिले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पाणी कपात करण्याची तयारी केली हेाती. मात्र, ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी धरणात मुबलक पाणी असल्याने कपात करण्यास विरोध राहील अशी भूमिका घेतली आणि त्यामुळे कपात बारगळी.

पाण्याचे नियोजन हे केवळ कथीत पाणी दार नेत्यांमुळे फसण्याची शक्यता असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे तर भाजपचे माजी सभागृह नेता कमलेश बोडके यांनी थेट सुधाकर बडगुजर यांनी विरोध केल्याने आयुक्तांनी निर्णय घेतला नाही असे सांगीतले. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनीही कोणाला काय वाटते यापेक्षा शहराचे हित कशात आहे. हे बघून आयुक्तांनी निर्णय घ्यायाला हवा होता, असे सांगितले.

Web Title: The re-planning of Nashik failed due to the opposition of the Thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.