पहिल्याच पावसात रस्त्याचा भराव गेला वाहून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2022 12:17 AM2022-06-26T00:17:23+5:302022-06-26T00:17:56+5:30
पिळ्कोस : कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात काल झालेल्या पहिल्या मुसळधार पावसाने राज्य महामार्ग क्र. १७ वरील गिरणा नदीवरील पिळकोस- बगडू पुलाच्या नुकतेच नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्याचा उत्तरेकडील बाजूचा रस्ता व पुलाचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेला असून या ठिकाणी लहान मोठे अपघात होऊ लागले आहेत. संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाहनधारक प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

भगदाड पडण्यास सुरुवात
दीड वर्षापासून ह्या रस्त्यावर संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला खोल साईटपट्ट्या कोरून ठेवल्या असून त्या भरल्या नसून,त्या ठिकाणी ही अपघात होत आहेत. शेतकऱ्यांच्या पाईप लाईन तोडल्या व त्या जोडून दिल्या नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. या राज्य महामार्ग क्रमाक १७ च्या रस्त्यावरून पावसाचे पाणी नदीकडे प्रवाहित होत असल्यामुळे पुलाच्या समोरील उतारावरील रस्त्याच्या कडेचा भराव यात वाहून गेला आहे. त्याठिकाणी खोल भाग झाला असून पुलाच्या दोन्ही बाजूला भगदाड पडण्यास सुरुवात झाली आहे. संबंधित विभागाने कायमस्वरूपी टिकाऊ असा भराव करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी वाहनधारकांकडून जोर धरत आहे.
शेतकऱ्यांत असमाधान
गेल्या आठवड्यात भादवण फाटा ते पिळकोस - बगडू पूल या एक किमी अंतरावर नवीन डांबरीकरण झाले. पहिल्या पावसात त्याचे पितळ उघडे झाल्याने मुसळधार पावसाचे पाणी याच दिशेने वाहून थेट गिरणा नदीवरील पिळकोस झ्रबगडू या पुलावर आले व त्यातच रस्ता खचला. पुलाच्या रस्त्याचा भराव वाहून गेला. संबंधित रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाचे अधिकारी फिरकत नसून झालेल्या कामांची गुणवत्ता व दर्जा याबाबतीत लोकप्रतिनिधी व शेतकरी असमाधानी आहेत.
सिमेंट गटारींची मागणी
गिरणा नदीवरील पिळकोस झ्रबगडू पुलावर अपघात हे नियमित घडत असतात. संबंधित विभागाने या रस्त्याला कायमस्वरूपी टिकेल असा भराव भरून रस्ता वाहतुकीस योग्य करावा व पुलाच्या दोन्हीही बाजूच्या रस्त्याला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंटच्या गटारी कराव्यात, अशी मागणी उपसरपंच प्रवीण जाधव, योगेश जाधव,राहुल सूर्यवंशी, संदीप जाधव, पंडित जाधव, अशोक जाधव, शिवा जाधव, सुनील जाधव, रोशन जाधव, उत्तम मोरे, ललित वाघ यांसह परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी केली आहे.