एसटी चालकाने गळफास घेत संपविला जीवनप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 01:53 AM2022-03-24T01:53:48+5:302022-03-24T01:54:35+5:30

नाशिक येथील त्र्यंबक रोडवरील फॉरेस्ट कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका ३४ वर्षीय एसटी चालकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. शिवनाथ ज्ञानदेव फापाळे असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

The ST driver ended his life journey by choking | एसटी चालकाने गळफास घेत संपविला जीवनप्रवास

एसटी चालकाने गळफास घेत संपविला जीवनप्रवास

Next
ठळक मुद्देहळहळ : त्र्यंबक रोडवरील फॉरेस्ट कॉलनीमध्ये घडली घटना

नाशिक : येथील त्र्यंबक रोडवरील फॉरेस्ट कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका ३४ वर्षीय एसटी चालकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली. शिवनाथ ज्ञानदेव फापाळे असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिवनाथ फापाळे हे कुटुंबीयांसोबत फॉरेस्ट कॉलनीमध्ये चार क्रमांकाच्या खोलीत वास्तव्यास होते. ते राज्य परिवहन महामंडळाच्या शहापूर येथील आगारामध्ये चालक म्हणून नोकरीस होते. बुधवारी सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी त्यांचे वडील ज्ञानदेव फापाळे यांनी पोलिसांना त्यांचा मृतदेह दाखविला. या वेळी राहत्या घराच्या छताला दोरीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष मृतदेह खाली उतरवून पंचनामा करत जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला. शिवनाथ यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: The ST driver ended his life journey by choking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.