विद्यार्थिनीचा मोबाइल चोरीला अन् बसला दीड तास खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2022 01:08 AM2022-02-23T01:08:29+5:302022-02-23T01:08:54+5:30

जुन्या सीबीएस बस स्थानकातून दुपारी साडेतीन वाजता त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या बसमध्ये एका विद्यार्थिनीच्या पाठीवरील बॅगमधून अज्ञात चोरट्याने मोबाइल काढून घेतल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २२) घडला. यामुळे दुपारची बस संध्याकाळी साडेपाच वाजता त्र्यंबकेश्वरच्या दिशेने सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोरून सुटली.

The student's mobile phone was stolen and the bus was detained for an hour and a half | विद्यार्थिनीचा मोबाइल चोरीला अन् बसला दीड तास खोळंबा

विद्यार्थिनीचा मोबाइल चोरीला अन् बसला दीड तास खोळंबा

googlenewsNext
ठळक मुद्देदुपारची बस संध्याकाळी रवाना : सरकारवाडा पोलिसांकडून प्रवाशांची झडती

नाशिक : जुन्या सीबीएस बस स्थानकातून दुपारी साडेतीन वाजता त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या बसमध्ये एका विद्यार्थिनीच्या पाठीवरील बॅगमधून अज्ञात चोरट्याने मोबाइल काढून घेतल्याचा प्रकार मंगळवारी (दि. २२) घडला. यामुळे दुपारची बस संध्याकाळी साडेपाच वाजता त्र्यंबकेश्वरच्या दिशेने सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोरून सुटली.

जुन्या सीबीएस बस स्थानकातून पेगलवाडी येथे राहणारी एक विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणींसह त्र्यंबकेश्वर बसमध्ये (एमएच १४ - बीटी ०३६७) जोरजोराने रडण्यास सुरुवात केली असता बसवाहकाने तिची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस स्थानकावरील बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस तेथे हजर नव्हते. ते अर्धा तास उशिराने तेथे दाखल झाले. तोपर्यंत बस तेथेच दुसऱ्या पोलिसांनी थांबवून ठेवली होती. चार वाजेच्या सुमारास बस स्थानकात कर्तव्यावर असलेले पोलीस पोहोचले. पोलिसांच्या सांगण्यावरून ती बस सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळ चालकाने आणली. येथे सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या महिला, पुरुष पोलिसांनी बसमधील प्रत्येक प्रवाशाला खाली उतरवून त्यांच्याकडे असलेल्या सामानाची झडती घेतली. तसेच काही प्रवाशांची अंगझडतीही यावेळी पोलिसांकडून घेण्यात आली; मात्र कोणाकडेही त्या शाळकरी मुलीचा मोबाईल आढळून आला नाही. प्रत्येक प्रवाशाकडे असलेला मोबाइल काढून तिला दाखवून ओळखण्याचाही प्रयत्न यावेळी पोलीस करीत हाेते.

--इन्फो--

रविवारीही बस पोलीस ठाण्याच्या दारात

नाशिक-साक्री (एमएच १४ - बीटी ३९०६) या बसमध्ये एका महिला प्रवाशाच्या हातातील सोन्याची बांगडी लंपास झाल्याची घटना रविवारी (दि. २०) बस स्थानकात घडली होती. यानंतर दुपारी चालक-वाहकाने बस थेट सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणली होती. यावेळी पोलिसांनी अशाच प्रकारे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना खाली उतरवून त्यांच्याकडे असलेल्या सामानाची झाडाझडती घेतली होती. यावरून जुने सीबीएस बस स्थानक तसेच ठक्कर बाजार येथील नवीन मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The student's mobile phone was stolen and the bus was detained for an hour and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.