युध्द थांबविण्यासाठी विद्यार्थांनी केली प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 11:30 PM2022-03-05T23:30:28+5:302022-03-05T23:30:50+5:30
अभोणा : संपूर्ण जगातील मानवजातीला चिंतेत टाकणाऱ्या रशिया - युक्रेन या दोन युरोपियन देशांमध्ये सुरू असलेला युद्ध संघर्ष तत्काळ थांबविण्यात यावा. यासाठी देसगांव (ता. कळवण) येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थना करीत युद्धात कामी आलेल्या दोन्ही देशांतील सैंनिकांना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी युद्धाचा निषेध करणारे प्रतीक सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आपल्या गणवेशाला तर युद्धाची भीषणता दाखविणारे कोलाज चित्र शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात आले होते.

मुख्याध्यापक बी. एन. देवरे यांनी यावेळी युध्दाची दाहकता व भविष्यातील त्याच्या दुष्परिणामांची जाणीव विद्यार्थ्यांना करून देतानाच याक्षणी कोणत्याही देशाला विरोध अथवा समर्थन न करता संपूर्ण जगाला शांततेची गरज आहे, असे प्रतिपादन केले. प्राथमिक शिक्षक किशोर भिसे यांनी ह्यजागतिक शांतता काळाची गरजह्ण या विषयावर विवेचन करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिक्षक निंबा चव्हाण, राजाराम पवार, गंगाधर लांडे, अशोक खांडवी, नीलेश कासार, संदीप वाघ, रामसिंग राजपूत, वनिता चव्हाण, रंजना गायकवाड, दिलीप दांडगे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. (०५ अभोणा)