रंगभूमीदिनाच्या दिवशीच रंगले  मानापमान नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:36 AM2018-11-06T01:36:43+5:302018-11-06T01:37:08+5:30

मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे महापालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने रंगभूमी दिनावरून मानापमान नाट्य रंगले आहे.

 Theater | रंगभूमीदिनाच्या दिवशीच रंगले  मानापमान नाट्य

रंगभूमीदिनाच्या दिवशीच रंगले  मानापमान नाट्य

Next

नाशिक : मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे महापालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने रंगभूमी दिनावरून मानापमान नाट्य रंगले आहे. महापौरांदी पदाधिकाºयांना डावलण्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून नजीकच्या काळात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  दरवर्षी मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने महापालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने रंगमंच आणि नटराज पूजनाचा कार्यक्रम होत असतो. त्याला शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर तसेच अन्य पदाधिकाºयांना बोलवले जात असते. परंतु यंदा मात्र परंपरा खंडित झाली. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते किंवा सभागृह नेता, गटनेता इतकेच नव्हे तर प्रभागाच्या नगरसेवकांनाही न बोलवता केवळ स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्तेच नटराज पूजन करण्यात आले. नाशिकच्या रंगभूमीचा उज्ज्वल काळ सध्या सुरू आहे. अनेक मालिकांमध्ये नाशिकचे कलावंत नाव गाजवत असल्याचे यावेळी आडके यांनी मनोगतात सांगितले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी परिषदेच्या कामकाजाची माहिती दिली. कार्यक्रमास लक्ष्मण सावजी, मधुकर झेंडे, विवेक पाटणकर, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, सदानंद जोशी, श्रीकांत बेणी, हेमंत महाजन, गिरीश गर्गे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन राजाराम भुसारे यांनी केले तर आभार सुनील ढगे यांनी मानले.
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी मनपाच्या वतीने कार्यक्रमास निमंत्रित केले जाते. परंतु यंदा निमंत्रण मिळालेच नव्हते. अनेक नगरसेवक आणि मनपाच्या पदाधिकाºयांना- देखील निमंत्रण नसल्याने कार्यक्रमास जाऊ शकले नाही.
- रंजना भानसी, महापौर
पदाधिकाºयांना डावलण्यात आले आहे. व्यवस्थापक कोण आहेत हेच कळत नाही. त्यामुळे मिळकत व्यवस्थापकांना भेटून संस्कृती ही संस्था कालिदास चालविण्यात तयार आहे हेच सांगितले आहे. बाकी गोष्टी महापालिकेने सांभाळाव्या,
- शाहू खैरे, उपाध्यक्ष, नाट्य परिषद, नाशिक शाखा
मराठी रंगभूमी दिनाचा कार्यक्रम यंदा दिवाळीमुळे छोट्याखानी पध्दतीनेच मर्यादित व्यक्तींमध्ये साजरा करण्यात आला. अगदी नांदीदेखील सादर झालेली नाही. त्यात कोणालाही डावलण्याची भूमिका नाही. दरवर्षी रंगभूमी दिन आणि महापालिकेचा वर्धापनदिन असे तीन दिवस कार्यक्रम होतात. परंतु यंदा दिवाळीत हे दिवस आल्याने सर्व सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. नाट्य परिषदेच्या वतीने महोत्सव दिवाळीनंतर होणार असून त्यावेळी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे.
- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्य परिषद, नाशिक शाखा

Web Title:  Theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.